नागपूर - मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी मागील तीन दिवसांपासून होत आहे. तेच दुसरीकडे वाढत्या तापमानाचा पारा पाहता ज्येष्ठ नागरिकांसाठी मंडप टाकून सावलीत बसण्याची सोय करून देण्यात आली आहे. पण असे असले तरी नाव नोंदणीसाठी करावी लागणारी प्रतीक्षा पाहता यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाच्या माहामारीपासून बचाव व्हावा म्हणून लसीकरण मोहिमेला सूरवात झाली आहे. यात पाहिल्या दिवशी जेष्ठ नागरिकांची लांबच लांब रांग लागल्याचे चित्र पाहयाला मिळाले. दुसऱ्या दिवशी तशीच परिस्थिती असल्याने ऑनलाईन नाव नोंदणी करून लांब रांगा लावून बसावे लागत असल्याने टोकन वाटप करण्यात आले. जेणेकरून नागरिकांना टोकननुसार केंद्रावर येता येईल.
टोकन मिळवण्यासाठी सकाळपासून गर्दी
टोकन घेण्यासाठी सकाळी 6 ते 7 वाजतापासून रांग लावली जात आहे. त्यानंतर 11 वाजताच्या सुमारास रुग्णलाय प्रशासनाकडून टोकन दिले जात आहे. यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून जवळपास तीन ते चार तास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे टोकन मिळवण्यासाठी वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन ते तीन तास टोकन मिळवण्यासाठी उभे राहत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे ठराविक लोकांना दररोज लस दिली जात असल्याने अनेकांना लाईनीत उभे राहून सुद्धा टोकन मिळू न शकल्याने वयोवृद्ध महिलेने सांगितले आहे.
उन्हाचा पारा वाढल्याने मंडप