नागपूर- लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या नवीन सूचना आल्या आहेत. यानुसार आता कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसेसमधील अंतर बारा ते सोळा आठवडे असणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतला असेल, तर दुसरा डोस बारा ते सोळा आठवड्यानंतर दिला जाणार असल्याने घराबाहेर पडण्यापूर्वी पहिला डोस घेऊन किती कालावधी झाला हे तपासून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.
पूर्वीच्या सूचनांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झाले नाही
पहिला डोस घेऊन झाला असेल आणि दुसरा डोज घ्यायचा असेल तर किमान 12 आठवडे, म्हणजेच तीन महिने झाले असेल तरच लसीकरणाची तारीख व लसीची उपलब्धता तपासून दुसऱ्या डोससाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. कोविशील्डसाठी हा नियम असला तरी, कोव्हॅक्सिन लसीच्या यापूर्वीच्या सूचनांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत.