नागपूर -हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या ( Balasaheb Thackeray Samruddhi Highway Accident ) बांधकाम स्थळी आठवड्याभरात दुसऱ्यांदा मोठा अपघात झाला आहे. त्यामुळे महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत ( Samruddhi Highway Contruction Quality ) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गेल्या दोन वर्षात समृद्धी महामार्गाच्या कामाकडे राज्य सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले असल्याने बांधकामाचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे बांधकामाचे क्वॉलिटी ऑडिट व्हावे, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस नियमित आढावा घ्यायचे -तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामाचा दर्जा महाविकास आघाडी सरकारच्या काळात घसरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या बांधकामाची गुणवत्ता राज्य सरकारने तत्काळ तपासावी. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात समृद्धीच्या निर्माण कार्याचा आढावा घेण्यासाठी आठवड्यातून एकदा बैठक होत होती. या बैठकीला स्वतः देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून बारीकसारीक गोष्टींच्या गुणवत्तेची शहानिशा करायचे, असेही बावनकुळे म्हणाले.