नागपूर - सतरापूर आणि नांदा गावादरम्यान वाहणाऱ्या नाल्यात आज दुपारी पूर आला होता. त्यामुळे नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत होते. त्यातच एका स्कॉर्पिओ चालकाने स्कॉर्पिओमध्ये लोक बसलेले असताना पुलावरून गाडी काढण्याचा धाडस केले. मात्र त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने गाडी ही थेट नदी पात्रात गेल्याची घटना घडली ( Scorpio swept away in flood waters at Nagpur ) आहे. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती मिळत आहे.
वाहन चालकाचे धाडस नडले - नागपूरच्या सावनेर तालुक्यातील नांदगाव गोमुख यागावी मध्यप्रदेश मधील बैतुल येथिल सहा जण पाहुणे म्हणून आले होते. परतीच्या मार्गावर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास परतीला जात असतांना पुलावर पाण्याचा प्रवाह वाढल्याने स्कॉर्पिओ अडकली. यावेळी काहींनी दोर देऊन त्याना बचावाचा प्रयत्न केला. पण पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की प्रयत्न अयशस्वी ठरले आणि वाहून गेलेत. यात वाहून गेलेल्या सहा पैकी तीन लोकांचे मृत्यूदेह मिळून आले. यात दोन महिला आणि एक वयोवृद्ध यांचा मृतदेह आहे. तेच तीन जण बेपत्ता असलेल्यामध्ये दोन पुरूष आणि एका मुलाचा समावेश आहे. या वाहन चालकाचा धाडसीपणा तीन जणांचा जीवावर बेतला आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ही स्कॉर्पिओ गाडी जवळपास पाचशे मीटर दूरवर जाऊन पोहचली. त्या ठिकाणी काचा फोडून तीन लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहे. उर्वरित जणांचा शोध घेण्यासाठी एसडीआरफ पथक आले आहे. पुढील शोधमोहीम करण्यासाठी सध्या अडचणी जात असल्याने उद्या मोहीम सुरू होईल अशी माहिती पुढे येत आहे.
स्कॉर्पिओमध्ये थेट पाण्यात - मात्र तेवढ्यात पाण्याचा लोंढा आला आणि पाण्याच्या धक्क्यामुळे पुलावरून स्कॉर्पिओ नाल्याच्या प्रवाहात वाहत गेली. सध्या पुलापासून काही अंतरावर स्कॉर्पिओ पाण्यात अडकलेली दिसत आहे. दरम्यान या घटनेत स्कॉर्पिओमध्ये बसलेले तीन जण मृत्युमुखी पडले आहेत तर तीन जणांचा शोध असल्याचे पोलिसांनी सांगितले.