महाराष्ट्र

maharashtra

School Reopening Nagpur : आजपासून 1 ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू

By

Published : Feb 1, 2022, 1:20 PM IST

जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यात वर्ग 1 ते 12 वर्गापर्यंतच्या सर्वच शाळा सुरू करण्याची निर्णय घेण्यात आला. यामध्ये कोवीड नियमावलीचे पालन करून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहे.

1 ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू
1 ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू

नागपूर - ओमायक्रॉनच्या प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आजपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यात वर्ग 1 ते 12 वर्गापर्यंतच्या सर्वच शाळा सुरू करण्याची निर्णय घेण्यात आला. यामध्ये कोवीड नियमावलीचे पालन करून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहे. राज्यातील अनेक भागात शाळा सुरू झालेल्या होत्या. मात्र नागपूर जिल्ह्यात ओमायक्रॉनचा रुग्णसंख्या वाढत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता.

1 ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू

राज्यातील इतर भागत जिथे कोरोनाच्या नवीन व्हेरीएंटचा प्रादुर्भाव नव्हता किंवा कमी होता. अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा होता. यातून नागपुरात जानेवारी 2022 मध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीवर होती. दररोज दोन हजाराच्या घरात कोरोना बधितांची नोंद असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. यात मनपा हद्दीतील प्रादुर्भाव मागील काही दिवसात कमी होताना दिसून येत असल्याने 1 हजार 159 शाळा आजपासून सुरू होणार आहे. यात 1 हजार 53 खासगी तर 116 मनपाचा शाळांचा समावेश आहे. तसेच नागपूर ग्रामीण क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या 1 हजार 35 आणि 3 हजार खासगी शाळा सुरू करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details