महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rana vs Shivsena : 'बंटी-बबलीला पोहचू द्या! मुंबईचे पाणी त्यांना माहीत नाही' - Navneet rana matoshree

राणा दाम्पत्य म्हणजे बंटी बबली असून भाजपाच्या नौटंकीतील पात्र आहे. लोक यांच्या हिंदुत्वाला गांभीर्याने घेत नाही. महाराष्ट्रात सर्व सण आम्ही मुंबईत साजरे करतो, बंटी बबली मुंबईत पोहोचले. यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. मुंबई पोलीस आणि शिवसैनिक तोंड द्यायला सक्षम आहे. भाजपला सी ग्रेड नटांची गरज पडत आहे, असे वक्तव्य खासदार संजय राऊत ( Sanjay Raut in Nagpur ) यांनी नागपुरात केले.

खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत

By

Published : Apr 22, 2022, 1:18 PM IST

नागपूर - 'कोणाला स्टंट करायचे असतील तर करू द्या, मुंबईचे पाणी त्यांना माहीत नाही. मुंबईचे लोक सक्षम आहे. हनुमान चालीसा वाचणे रामनवमी साजरी करणे हा श्रद्धेचा विषय आहे. नौटंकी आणि स्टंटचा विषय नाही' अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली. ते नागपुरता माध्यमांशी बोलतांना म्हणाले. ते दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहे.

'बंटी-बबलीला पोहचू द्या! मुंबईचे पाणी त्यांना माहीत नाही'

नौटंकीतील पात्र - राणा दाम्पत्य म्हणजे बंटी बबली असून भाजपाच्या नौटंकीतील पात्र आहे. लोक यांच्या हिंदुत्वाला गांभीर्याने घेत नाही. महाराष्ट्रात सर्व सण आम्ही मुंबईत साजरे करतो, बंटी बबली मुंबईत पोहोचले. यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. मुंबई पोलीस आणि शिवसैनिक तोंड द्यायला सक्षम आहे. भाजपला सी ग्रेड नटांची गरज पडत आहे.

हेही वाचा -Navneet Rana vs Shivsena : शिवसैनिकांना हुलकावणी देत राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; मातोश्रीवरील सुरक्षेत वाढ

बार कौन्सिलच्या नोटीसीला उत्तर देणार - नवाब मलिक यांना दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून नकार दिला. मलाही कोर्टाचा सामना कारवा लागत आहे. दिलासा फक्त भाजपच्य विचारधारेच्या लोकांना मिळत आहे, त्यामुळे हा सर्वात मोठा घोटाळा आहे. यात दुसऱ्यांदा सांगतो मोठा घोटाळा आहे. इंडियन बार कौन्सिलने माझा विरोधात याचिका टाकली आहे. मी याला उत्तर देईल असेही संजय राऊत म्हणाले.

मग तुम्हाला सद्बुद्धी का मिळाली नाही - संजय राऊत यांना सद्बुद्धी मिळेल अशी टीका फडणवीस यांनी केली होती त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले या मातीतून भलेभले लोक देशाला मिळाले आहे. आता विषय निघाला तर आम्हाला सद्बुद्धी मिळत असेल तर तुम्हाला का मिळाली नाही असा सवाल त्यांनी फडणवीसा केला आहे. पूर्वी सद्बुद्धी मिळाली असती तर कदाचित आजचे चित्र आणि राजकारण वेगळं असतं तुम्ही आज मुख्यमंत्री असता असेही राऊत म्हणाले. हिंदुत्ववादी मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याची वेगळी सद्बुद्धी मिळाली. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून आज महाविकासआघाडी निर्माण झाली शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे आमची बुद्धी आणि सद्बुद्धी त्यावर आम्ही काम करतो. संजय राऊत यांच्या कर्यक्रमात वीज चोरी झाली यावर उत्तर देताना राऊत म्हणाले माझ्या लक्षात आलेय आम्ही त्याची चौकशी करून पक्षाची एखादी समिती नेमून असे म्हणून चोरीच्या प्रश्नावर उत्तर देत वेळ मारून दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details