नागपूर - आमच्या सारखे लोक युद्धाचा अनुभव घेत असतात. आपल्या देशात रशिया-युक्रेन सारखे युद्ध सुरू नाही. मात्र, दिल्लीत पुतीन बसले असून ते रोज आमच्यावर ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स नावाच्या मिसाईल सोडत आहेत, अशी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुतीन यांची उपाधी देऊन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. (Raut criticise against Modi) ते नागपुरमध्ये आयोजीत एका कार्यक्रमात बोलत होते. राज्यातील काही नेत्यांना ईडीने अटक केली आहे, तर काहींची चौकशी सुरु आहे. अशातच परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हूण्यांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली.
ज्या राज्यात आपले सरकार नाही, त्या राज्यातील लोकांना अधिक सन्मानाने वागवले पाहिजे, अशी शिकवण आम्हाला माजी पंतप्रधान पंडित नेहरूं कडून मिळाली आहे. (Sanjay Raut called Modi Putin) जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांचाही सन्मान करणे ही लोकशाही आहे. आपली टिमकी न वाजवता सर्वांचा सन्मान केला पाहिजे अशी शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली आहे. पण आजच्या घडीला पत्रकारितेचे काम बदलले आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, अशी खंतही राऊत यांनी व्यक्त केली आहे.