नागपूर - संभाजी राजे यांच्या उमेदवारीला पाठिंब्यावरून राजकारण तापले आहे. मराठा समाजही संतप्त झाला आहे. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्याप्रकारे सर्वात आधी शरद पवारांनी हा विषय सुरू केला आणि नंतर ज्या दिशेने हा सर्व विषय गेला. ते पाहून मला असे वाटते की एक वेगळ्या प्रकारचा हा सर्व विषय झालेला आहे. मला असे वाटते की संभाजी राजे यांची कोंडीचा करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. मात्र, हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, मी त्याबद्दल बोलणार नाही अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार यांच्यावर केली. ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
Devendra Fadnavis Reaction : संभाजी राजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला - देवेंद्र फडणवीस - संभाजी राजे यांना राज्यसभेची उमेदवारी
संभाजी राजे यांच्या उमेदवारीला पाठिंब्यावरून राजकारण तापले आहे. मराठा समाजही संतप्त झाला आहे. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्याप्रकारे सर्वात आधी शरद पवारांनी हा विषय सुरू केला आणि नंतर ज्या दिशेने हा सर्व विषय गेला. ते पाहून मला असे वाटते की एक वेगळ्या प्रकारचा हा सर्व विषय झालेला आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना महागाईवर बोलण्याचा अधिकार नाही. सर्वात पहिले पवार साहेबांनी या गोष्टीचा उत्तर दिले पाहिजे की महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल वर राज्याचा कर 29 रुपये आहे आणि केंद्राचा कर 19 रुपये आहे. ते राज्याचा लावत असलेला कर कमी का करत नाही असा सवाल उपस्थित केला. महाराष्ट्रात महागाई वाढवण्याचे काम या सरकारने केले आहे, पेट्रोल डिझेल वर 29 रुपये कर लावून एक रुपयही कर कमी करता हे लोक महागाईवर बोलतातच कसे काय मला समजत नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
हेही वाचा -Sugar Export Restricted : साखरेच्या निर्यातीवर केंद्र सरकारचे निर्बंध..