नागपूर -बहीण भावाच्या पवित्र नात्याला आणखी घट्ट बंधनात बांधणारा सण म्हणजे रक्षाबंधन. हे नातं किती भावनिक असतं हे सांगण्यासाठी कोणत्याही साक्षपुराव्याची गरज नाही. रेशमी धाग्यात गुंफलेले हे नाते म्हणजे निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक. यावर्षी ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. त्याकरिता बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक राख्या उपलब्ध झाल्या आहेत. मात्र नागपूरकरांना भुरळ पडली आहे ती म्हणजे श्रद्धानंद अनाथालयातील ( Shradhanand Orphanage ) लहान मोठ्या विद्यार्थ्यांनींनी तयार केलेल्या इको-फ्रेंडली ( Eco Friendly Rakhi ) राख्यांची. अतिशय सुबक आणि आकर्षक तितक्याच स्वस्त इको-फ्रेंडली राख्या श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनी दिवस-रात्र एक करून इको-फ्रेंडली राख्या तयार करत आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत तयार झालेल्या पाच हजार राख्यांची विक्री झालेली आहे.
प्रत्येक राखीत प्रत्येक राखीत विविध झाडांचे सिड्स (बी) ठेवण्यात आले -निसर्गाचं सर्वधन ही थीम डोळ्यासमोर ठेऊन श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थ्यांनींनी राख्या तयार करत आहेत. श्रद्धानंद अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये कौशल्य विकसित व्हावे यासाठी अनाथालयात कडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे सणाच्या मागणी नुसार वस्तू तयार करणे आहे. श्रद्धानंद अनाथालयातील मुलींना जरी हक्काचा भाऊ नसला तरी एकमेकींच्या भावनिक नात्यात त्या गुंफल्या गेल्या आहेत. त्यांनी तयार केलेल्या राख्यांमध्ये तोच भाव आहे जो एक बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधताना असते. समाज व्यवस्थेनुसार एक भाऊ बहिणीचा पाठीराखा समजला जातो त्याच प्रमाणे या विद्यार्थ्यांनी एकमेकींच्या सुख दुःखाच्या वाटेकरी आहेत. राखी तयार करण्याच्या उपक्रमात एकमेकींना सांभाळून घेत त्यांनी तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त राख्यांची निर्मिती केली आहे. विषेश म्हणजे प्रत्येक राखीत प्रत्येक राखीत विविध झाडांचे सिड्स (बी) (Seeds of different plants in each rakhi )ठेवण्यात आले आहेत. ते सिड्स जमिनीवर पडल्यानंतर तिथे झाडं उगवणार अशी आशा या विद्यार्थ्यांनीना आहे.