नागपूर - युक्रेनवर रशियात सुरू झालेल्या युद्धाचे ( Russia Ukraine Crisis ) गंभीर परिणाम अनेक देशांना येत्या काळात सोसावे लागणार आहे. भारतालाही याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे ( Russia Ukraine War Effects On India ) संरक्षण तज्ञ सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितले. युद्धामुळे रशियाकडून कच्चे तेल आणि वायुसाठा मिळणे बंद झाल्यास याची कच्चा तेलाच्या किमतीत मोठी वाढ होईल. युक्रेनच्या मदतीला न गेलेल्या अमरेरिकेची नाचक्की झाली असली तरी, अमेरिकेला या उद्भवलेल्या परिस्थितीतही फायदा होणार असल्याचेही सेवानिवृत्त कर्नल पटवर्धन यांनी सांगितले. यासविस्तर विषयावर जाणूज घेऊ या खास रिपोर्टमधून..
गॅस आणि युरेनियमचे साठे
युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरू झाले असले तरी यामागे रशियाचे राष्ट्रीय धोरण आहे. स्वतःचा देशाच्या सीमा चारही बाजूने सुरक्षित करणे हे मुख्य अजेंडा असून, दुसरे म्हणजे आपले वर्चस्व वाढवण्याचेही धोरण या युद्धामागे आहे. यात रशियाने युक्रेन लगतच्या क्रिमियावर 2014 मध्ये ताबा मिळवत स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. यात डॉननसेट भागातील दोन्ही राष्ट्रात मोठया प्रमाणात गॅस, तेल आणि युरेनियमचे साठे आहे. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा त्यावर डोळा होता. यात अखंड रशिया निर्माण करण्यासाठी युक्रेनला रशियाच्या अधिपत्याखाली आणण्याचा खरा प्रयत्न असल्याचेही संरक्षण विषयाचे अभ्यासक कर्नल पटवर्धन सांगतात.
तिसऱ्या महायुद्धाची भीती
अमेरिका आणि नाटो देशांनी आपल्यामध्ये समाविष्ट करू पाहणाऱ्या युक्रेनला मदतीसाठी सैन्य न पाठवण्याचे निर्णयामुळे जगभारत एक प्रकारे नाचक्की होत आहे. या युद्धाचा परिणाम म्हणून युरोपला राशियामधून होणारा गॅस आणि तेल पुरवठा बंद पडण्याची शक्यता आणि भीती आहे. त्यामुळे नाटोचे सदस्य असलेल्या जपान आणि फ्रांसमध्ये या खदखद सुरू झाली आहे. यात हे युद्ध सुरू होऊन जेमतेम दोन दिवस झाले असून, आतापर्यंत केवळ 20 ते 22 किलोमिटरचा भूभाग रशियाने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे तूर्तास हे युद्ध थांबेल अशी चिन्ह नाहीत. दुसरीकडे युक्रेनला पूर्व पश्चिम आणि ब्लॅकसीच्या बाजूने घेरून मधात कोंडी करण्याच्या तयारीत रशिया आहे. पण युक्रेन जवळही न्यूक्लियर अस्त्र असल्याने तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त होत आहे. शिवाय तसे झाल्यास अनेक देशांना गंभीर परिणाम येत्या काळात दिसतील अशी भीती आणि चिंताही सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या निर्बंधाचा रशियावर परिणाम होणार?का? काय आहे रशियाचा प्लॅन बी..
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युद्ध सुरू होण्यापूर्वी युद्धाचे परिणाम लक्षात घेऊनच प्लॅन बी तयार ठेवला आहे. यात अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लादल्यास युरोप रशियाकडून कच्चे तेल खरेदी बंद करू शकतो. त्यामुळे रशियाने आर्थिक कोंडी करण्याचा पर्यंत झाल्यास त्यावर उत्तर शोधून ठेवले आहे. राशियाने चीनसोबत 172 बिलियन डॉलरचे तेल आणि वायू खरेदीचा करार युद्ध सुरू करण्यापूर्वीचा केला आहे. जगातील इतर देशांना रशिया तेलसाठा विकत असल्याने त्याचा गंभीर परिणाम त्या देशांवर पडणार आहे. तसेच मोठा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडणार आहे.