नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी कार्यक्रम होणार यंदा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रेशीमबागच्या मोठ्या मैदानावर घेण्यात येणार नाही. तर स्मृती मंदिरातील महर्षी व्यास सभागृहात घेतला जाणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा कार्यक्रम यंदा होणार सभागृहात; केवळ ५० निमंत्रितांनाच प्रवेश - सरसंघचालक मोहन भागवत न्यूज
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्याही मान्यवराला बोलविण्यात आलेले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दरवर्षीप्रमाणे करण्यात येणारे पथसंचालन आणि कवायती यंदा रद्द करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्याही मान्यवराला बोलविण्यात आलेले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दरवर्षीप्रमाणे करण्यात येणारे पथसंचालन आणि कवायती यंदा रद्द करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाकडे संपूर्ण देशात लक्ष लागलेले असते. संघाच्या व्यासपीठावरून सरसंघचालक मोहन भागवत यांचे संबोधन ऐकण्याकरिता देशाच्या प्रत्येक राज्यातून हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक नागपूरला येतात. सरसंघचालक मोहन भागवत आपल्या भाषणात देशातील राजकीय परिस्थितीवर आपले मत व्यक्त करतात. त्याचे अनेक राजकीय अर्थदेखील काढले जातात. सत्ताधाऱ्यांना सल्ला आणि चिमटे काढण्याचे कामदेखील सरसंघचालक विजयादशमी कार्यक्रमातून करत आलेले आहे. यंदा कोरोनाचा देशातील शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याबाबत सरसंघचालक काय बोलता, याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असणार आहे.
कोरोनामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठीच या वर्षी विजयादशमी कार्यक्रम रेशीमबागच्या मोठ्या मैदानावर घेण्यात येणार नाही. तर स्मृती मंदिरातील महर्षी व्यास सभागृहात केवळ ५० निमंत्रितांनाचा प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या कामावर मत व्यक्त करताना ते राज्य सरकारवर काय बोलतील हेदेखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण स्वयंसेवक ऑनलाइन बघू शकणार आहेत.