नागपूरआपल्या देशात पुरुष श्रेष्ठ की नारी श्रेष्ट यावर Mohan bhagwat on women empowerment in nagpur जाणीवपूर्वक विवाद निर्माण केला जातो. पण, दोन्ही पाय सोबत राहणे हे आमची संस्कृती आहे. त्यामुळे महिला आणि पुरुष एक समान असल्याचे स्पष्ट मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते नागपूर येथे अखिल भारतीय महिला चरित्र कोश प्रथम खंड - प्राचीन भारत RSS chief mohan bhagwat या पुस्तकाच्या लोकार्पण समारोह कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का उपस्थित होत्या.
हेही वाचाGaneshotsav राज्यभरात गणेशोत्सव निर्बंधमुक्त असले तरी नागपुरात निर्बंधाची साखळी आणखी घट्ट
आपला इतिहास एवढा जुना आहे की तो एका संग्रहात होऊच शकत नाही. तो इतिहास अनेक खंडात द्यावा लागेल. महिलांसंदर्भात एक सर्व्हे झाला तो सुद्धा महिलांनीच केला, त्याचा वापर सरकार सुद्धा करते, हे आमच्या महिला शक्तीची ताकत असल्याचे सरसंघचालक भागवत म्हणाले. आपला भारत देश महाशक्ती होणार, असे म्हणतात. देश महासत्ता झाला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे, मात्र तो कसा होईल हे बघितले पाहिजे. या प्रक्रियेत महिलांचा मोठा सहभाग होणे आवश्यक आहे आणि ते होत आहे यावर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.