नागपूर -मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केंद्र सरकारवर केलेल्या टिकेला केंद्रीय राज्य सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उत्तर दिले असून आम्ही छापा टाकून काटा काढत नसून काटा काढून छापा टाकतो, असे म्हटले आहे. तसेच रिपब्लीन पक्ष देशभरात वाढवण्याचे काम सुरू असून यूपीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाशी युती करण्यासाठी लवकर शक्तिप्रदर्शन करून दलित मतदार असलेल्या जागा मागणार असल्याचेही ते म्हणाले.
'आम्हाला आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता' -
येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये होऊ घातलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपासोबत युती करण्याच्या विचारात असल्याचे रामदास आठवले म्हणाले. यासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले. यूपीत 18 डिसेंबर रोजी रमाबाई मैदानावर एक लाख लोकांची रॅली काढून आम्ही आमच्या पक्षाची ताकद दाखवून देणार आहोत. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्याशीही युती संदर्भात चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आम्हाला आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता असून युती झाल्यास भाजपाला याचा फायदा होईल असेही ते म्हणाले.
निवडणूक पडण्यापेक्षा जिकण्यासाठी लढत आहोत -
सगळ्या जागेवर मायावती यांचा कबजा नाही, त्या आमचा नेत्या आहेत. बसपाने आमच्या जागेवर कब्जा केला आहे. रिपब्लिक पक्ष अगोदर होता. चारसिंगच्या सरकारमदज्ये 19 आमदार निवडणून आले होते. त्यामुळे किमान अर्ध्या जागा द्याव्या अशी आमची मागणी आहे. एकटे निवडणूक लढल्यास पराभव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकी पडण्यासाठी लढण्यापेक्षा जिंकण्यासाठी लढावा असा आमचा विचार आहे पण अजूनही स्वतंत्र स्वबळावर लढण्याचा हा कुठला विचार नसून भाजपच्या सोबतच हे निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले.