महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चिंताजनक : रुग्णाच्या आतड्यात काळ्या बुरशीचा संसर्ग; मेंदू-डोळे-जबड्यासह अन्य अवयवांनाही म्युकर मायकोसीसचा धोका - nagpur mucarmycosis

यात अनेकांना डोळे जबडे काढण्यासोबत आता काळी बुरशी ही शरीराच्या इतर भागातील अवयवांवर संसर्ग होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपूरच्या सेव्हनस्टार रुग्णालयात पोटाच्या आतड्यासह पाय, गळा अशा अवयवांवरही हा काळ्या बुरशीचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे.

म्युकर मायकोस
म्युकर मायकोसीस

By

Published : Jul 28, 2021, 7:04 AM IST

Updated : Jul 28, 2021, 12:22 PM IST

नागपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिथे अनेकांनी जीवाला मुकले. यातून जे वाचले त्यांना म्युकर मयकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराने पोखरून काढले. यात अनेकांना डोळे जबडे काढण्यासोबत आता काळी बुरशी ही शरीराच्या इतर भागातील अवयवांवर संसर्ग होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपूरच्या सेव्हनस्टार रुग्णालयात पोटाच्या आतड्यासह पाय, गळा अशा अवयवांवरही हा काळ्या बुरशीचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे.

न्य अवयवांनाही म्युकर मायकोसीसचा धोका

नागपूरच्या सेव्हन स्टार रूग्णालयात काळ्या बुरशीच्या एका 78 वर्षाच्या रुग्णावर उपचार सुरू आहे. यात त्या रुग्णाला कोव्हिडनंतर जून महिन्यात काळ्या बुरशीचा त्रास झाला. त्यात त्यांचा डावा डोळा निकामी झाला. पण त्यानंतर सुद्धा संसर्ग हा शरीरातून नष्ट झाला नाही. पोटात दुखत असल्याने प्रसिद्ध लॅप्रोस्कोपीक आणि एंडोस्कोपीक तज्ज्ञ प्रशांत राहाटे यांच्याकडे रुग्ण आला. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. सिटी स्कॅनसह काही परीक्षण केले. त्यानंतर ओटी पोट दुखत असलेल्या भागावर सर्जरी केली तेव्हा पोटाच्या आतड्यांमध्ये अंदाजे सहा इंचाच्या भागांवर काळा बुरशीचा संसर्ग झाल्याचे समोर आले. यामुळेच पोट दुखत असल्याचे निदान झाले. यावेळी डॉ. प्रशांत राहाटे यांनी तो शरीराचा भाग काढून टाकला. सध्या या रुग्णावर अजून उपचार सुरु असल्याचेही सांगितले.

डॉ. प्रशांत राहाटे

कोरोनानंतर अधिक रुग्ण

तज्ज्ञ डॉ. प्रशांत राहटे सांगतात त्यांच्याकडे म्युकरचा रुग्ण यापूर्वी चार ते पाच वर्षात एखादा रुग्ण येत असत. पण, कोरोनानंतर अनेक रुग्ण समोर आले. यात गळ्यातील श्वसनलिकेला (ट्रिकीओस्टोमी) फुफुसामध्ये याचे बॉल्स तयार होऊन हा पोखरून काढत असल्याचेही रुग्ण आले. एका रुग्णाला असून हत्तीरोग झालेल्या पायात सुद्धा म्युकर मिळून आला. यासोबत एक रुग्ण हा मूळव्याध (पाईल्स)च्या शस्त्रक्रियेनंतर सुद्धा काळ्या बुरशीची लागण झाली असल्याचे डॉ. प्रशांत राहाटे सांगतात.

काळी बुरशी ही शरीराच्या इतर भागात कशी जाते

काळ्या बुरशीचा संसर्ग हा रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने होत आहे. यात मधुमेह यासह इतर दुर्धर आजार असणाऱ्यांना याचा धोका अधिक आहे. यात सायनस म्हणजे नाकात असणारा ही बुरशी हळूहळू डोळे जबडे आणि मेंदूपर्यंत जात असल्याचे शेकडो रुग्ण पुढे आले. पण याच रुग्णामध्ये लाळ किंवा श्वास नलिकेतून पोटासह शरीरातील इतर भागत जात असल्याची भीती डॉ. प्रशांत राहाटे यांनी व्यक्त केले.

अन्य अवयवांनाही म्युकर मायकोसीसचा धोका

फंगस शरीरात कसा वाढतो

काळी बुरशी रक्तात शिरल्यास रक्तातील लोह(आयर्न) कडे आकर्षित होऊन त्या नष्ट करून त्यावर जगतो. आर्यन खाऊन काली बुरशी वाढत जाते. यामुळे रक्तवाहिन्या बंद होऊन मृत पावतात. यानंतर त्यांचा संसर्ग हा अधिक वाढत जातो. एका रक्तवाहिनी नंतर दुसऱ्या रक्तवाहिनीत जाऊन हा संसर्ग शरीरात पोहोचण्याची भीती असते. यामुळे शरीरात काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्यास, तो भाग काढून टाकला जातो. त्याला पोषक ठरतील अशा बाबीवर औषध देऊन नष्ट केला जातो.

उपराजधानीत जास्त म्युकर मायकोसीसचे रुग्ण

नागपूर जिल्ह्यात इतर भागाच्या तुलनेत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये 1718 रुग्ण म्युकरचे रुग्ण असल्याचे समोर आले आहे. आहे. यात 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 1354 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. यापैकी 1451 रुग्णानी उपचार घेऊन बरे झाले आहे.

हेही वाचा -पोर्नोग्राफी प्रकरण: राज कुंद्रा यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी

Last Updated : Jul 28, 2021, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details