नागपूर - शैक्षणिक फी माफी न झाल्यामुळे आजपासून राज्यातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. कोरोना काळात कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता दिवस-रात्र रुग्णालयात सेवा दिल्यानंतरदेखील राज्य सरकार निवासी डॉक्टरांच्या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करत नसल्याचा आरोप या डॉक्टरांनी केला आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) आणि रुग्णालय त्याचबरोबर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतला आहे.
कोरोना काळात रुग्ण सेवेत कार्यरत असलेल्या निवासी डॉक्टरांचा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी शैक्षणिक शुल्क माफीचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही त्या आश्वासन पूर्तता न झाल्यामुळे नाईलाजाने निवासी डॉक्टरांना आजपासून काम बंद आंदोलन सुरू करावे लागल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेन्सीच्या (मार्ड) डॉक्टरांनी दिली आहे. या आंदोलनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व एमडी एमएस,डिप्लोमा, सीपीएस, डीएम, एमसीएच डॉक्टर सहभागी झाले आहेत.
राज्यातील निवासी डॉक्टर विविध मागण्यांकरिता संपावर; नागपुरात दिसला प्रभाव - निवासी डॉक्टर शैक्षणिक संप
कोरोना काळात रुग्ण सेवेत कार्यरत असलेल्या निवासी डॉक्टरांचा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी शैक्षणिक शुल्क माफीचे आश्वासन दिले होते. परंतु सरकारने शैक्षणिक शुल्क माफीचा निर्णय न घेतल्यामुळे राज्यस्तरीय आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतल्याचे मार्डचे अध्यक्ष बन्सल यांनी सांगितले. आंदोलनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व एमडी एमएस,डिप्लोमा, सीपीएस, डीएम, एमसीएच डॉक्टर सहभागी झाले आहेत.
हेही वाचा-सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबानी देशात सर्वाधिक श्रीमंत; 1007 श्रीमंतांकडे हजार कोटीहून अधिक संपत्ती
गरज सरो वैद्य मरो-
कोरोना संपताच राज्य सरकारचा व्यवहार हा गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीप्रमाणे असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत सेंट्रल मार्ड संघटनेची बैठक झाली होती. बैठकीत राज्य सरकारला स्मरणपत्र देण्याचे ठरले होते. वैद्यकीय शिक्षणमंत्रीसोबत चर्चा झाली. परंतु सरकारने शैक्षणिक शुल्क माफीचा निर्णय न घेतल्यामुळे राज्यस्तरीय आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतल्याचे मार्डचे अध्यक्ष सजल बन्सल यांनी सांगितले.
हेही वाचा-महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका, जाणून घ्या नवी किंमत
रुग्ण सेवा विस्कळीत होणार
नागपूर शहर हे राज्याची उपराजधानी दर्जाचे आहे. नागपूरमध्ये दोन वैद्यकीय महाविद्यालय आहेत. या रुग्णालयांमधून विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड य सारख्या राज्यांतून रुग्ण येतात. मात्र, निवासी डॉक्टर संपावर गेल्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा-खुशखबर! रामोजी फिल्म सिटी 8 ऑक्टोबरपासून पुन्हा होणार खुली; पाहायला मिळणार 'ही' मनोरंजनाची ठिकाणे