नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालय रेकी प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांसह राज्य आणि दहशतवादी विरोधी पथक म्हणजेच एटीएस सुद्धा करत असल्याची माहिती नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. (Jaish-e-Mohammed terrorist organization) एटीएस या संपूर्ण तपासात महत्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. (Reiki case of Sangh headquarters by terrorists) जैश-ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांकडून नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी करण्यात आली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
रईस अहमद असाद उल्ला शेखची कस्टडी
गेल्या महिन्यात सुरक्षा एजन्सीने अटक केलेल्या दहशतवादयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर येथील मुख्यालयाची रेकी केल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर सुरक्षा एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत. जैशचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख याने नागपूर येऊन रेकी केली होती. या रेकी प्रकरणातील अधिक माहिती मिळवण्यासाठी नागपूर पोलीस देखील जैशचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेखची कस्टडी घेण्याच्या प्रयत्नात आहे.