नागपूर -जगात पहिल्यांदाचं अकुशल जनसहभागातून ७५ फूट अखंड वस्त्राची निर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग नागपुरमध्ये झाला आहे. १४२६ लोकांच्या सहभागातून तब्बल १०८ दिवसानंतर महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाने आगळ्यावेगळ्या ( Azadi Ka Amrit Mahotsav ) रेकॉर्डला गवसणी घातली आहे. या प्रयोगाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ( Asia Book of Records and India Book of Records ) अधिकृत नोंद झाली आहे. जनसहभागातुन विणलेले वस्त्राची लांबी मोजण्यासाठी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकृत प्रतिनिधी डॉ मनोज तत्वादी उपस्थित होते. ७५ फूट अखंड वस्त्र तयार करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्रा, लोकांच्या उत्साहामुळे तब्बल ९८ फुटाचे अखंड वस्त्र तयार झाले आहे. यापूर्वी अशा प्रकारचा रेकॉर्ड तयार करण्याचा ध्येय कुणीही घेतले नाही. त्यामुळे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला नवीन कॅटींगरी तयार करावी लागली आहे. हातमाग महामंडळाच्या आयुक्त शीतल उगले, तेली यांच्या संकल्पनेतुन हा पुढाकार घेण्यात आला होता.
Azadi Ka Amrit Mahotsav : एकतेचे वस्त्र विणण्याचा उपक्रम पूर्ण; आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - आझादी का अमृत महोत्सव
१४२६ लोकांच्या सहभागातून तब्बल १०८ दिवसानंतर महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाने आगळ्यावेगळ्या ( Azadi Ka Amrit Mahotsav ) रेकॉर्डला गवसणी घातली आहे. या प्रयोगाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ( Asia Book of Records and India Book of Records ) अधिकृत नोंद झाली आहे. जनसहभागातुन विणलेले वस्त्राची लांबी मोजण्यासाठी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकृत प्रतिनिधी डॉ मनोज तत्वादी उपस्थित होते.
'विणलेल्या वस्त्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जॅकेट भेट देणार' :फॅब्रिक ऑफ युनिटी म्हणजेच एकतेचे वस्त्र विणण्याच्या अभिनव उपक्रमांतर्गत तयार झालेल्या कापडापासून अनेक जॅकेट्स तयार केले जाणार आहेत. ते जॅकेट्स देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील आणि राज्यातील गणमान्य व्यक्तींना उपहार स्वरूपात भेट दिली जाणार असल्याची माहिती महामंडळाच्या आयुक्तांनी दिली आहे.
हेही वाचा -Azadi Ka Amrit Mahotsav : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष; 'एकतेचे वस्त्र' विणण्याचा अभिनव उपक्रम