नागपूर -कोरोनावर एकमेव रामबाण उपाय म्हणजे लसीकरण आहे. यातच नागपूर जिल्ह्यात 18 वर्षावरील लसीकरण मोहिमेला सुरवात झाली आहे. लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे. एकाच दिवसात नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये 41 हजार 881 जणांचे विक्रमी लसीकरण झाले आहे.
बुधवारी आलेल्या अहवालात नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 18 हजार 18 नागरिकांनी लस घेतली. तेच शहरातील मनपाच्या हद्दीत 22 हजार 221 नागरिकांनी विविध केंद्रावर लस घेतली. तर खासगी हॉस्पिटलमध्ये 1 हजार 482 अशा एकूण 23 हजार 703 नागरिकांनी लस घेतली आहे. जिल्हा व महानगरपालिका आरोग्य यंत्रणेने नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणात सहभागी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील लसीकरण लवकर पूर्ण व्हावे यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. लस ही सुरक्षित आहे. याबाबतचे गैरसमज टाळावे स्वतःचा जीवाच्या रक्षणासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले जात आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणार 'डेल्टा व्हेरीएन्ट'? रत्नागिरी, जळगावात सर्वाधिक रुग्ण