नागपूर - गुन्हेगारी ते खेळाचे मैदान हा मागील 20 वर्षाचा संघर्ष झुंड चित्रपटातून ( Zund Movie ) समोर आला. यातून 'स्लम सॉकर' हा घरोघरी ( Slum Soccer Football Tournament ) पोहचला. महानायक अमिताभ बच्चन ( Actor Amitabh Bachchan ) यांच्या अभिनयाचे कौतुकही झाले. दिगदर्शक नागराज मंजुळे ( Director Nagraj Manjule ) यांनी हा संर्घष तेवढ्याच ताकदीने लोकांसमोर मांडला. पण अमिताभ यांनी ज्यांची भूमिका बजावली अशा 'रियल लाईफ'मधील हिरो विजय बारसे ( Sport Trainer Vijay Barse ) यांचा प्रायोजक मिळण्याचा संघर्ष सुरूच आहे. काय आहेत त्यांच्या नेमक्या अडचणी, जाणूज घेऊयात या खास रिपोर्टमधून.
दोन दशकांचा संघर्ष : स्लम सॉकर ही एक फुटबॉल स्पर्धा आहे. याच स्पर्धेसाठी क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यानी आपले जीवन वाहून घेतले. झोपडपट्टीतील मुलांना गुन्हेगारी जगण्यातून बाहेर काढत मैदानावर ताकद दाखवण्यासाठी संघर्ष केला. सुरवातीला एक एक मुलांला खेळाच्या मैदानापर्यंत नेण्याचा संघर्ष, त्याना फुटबॉल खेळात आंतरराष्ट्रीय प्राविण्य मिळावे म्हणून त्या दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा संघर्ष होता. असा हा पदोपदी असलेला संघर्ष पाच, दहा वर्षाचा नाहीतर दोन दशकांचा संघर्ष आहे. हाच संघर्ष चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांनी पहिला आणि विजय बारसे यांच्या कार्याला कौतुकाची थाप दिली.
स्लम सॉकरचा संघर्ष सुरूच :स्लम सॉकर ही फुटबॉल स्पर्धा 2001 पासून घ्यायला सुरुवात झाली. हळूहळू याचा प्रसार हा भारतापुरता मर्यादित न राहता सात समुद्रापार अनेक देशात जाऊन पोहचला आहे. यातच सप्टेंबर महिन्यात होमेलेस संस्थेकडून न्यूयॉर्कमध्ये फुटबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूची गरज आहे. यासाठीच येत्या मे महिन्यात राष्ट्रीय स्तरावर स्लम सॉकर स्पर्धा होणार आहे. पण या स्पर्धेसाठी अद्याप प्रायोजक मिळाले नसल्याने आर्थिक भांडवल उभारणीचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. यात काही औद्योगिक घराण्यांकडून विचारणा झाली असली तरी, अद्याप ठोस काही हाती लागले नाही. पण यावर विजय बारसे यांनी हार मानली नाही. त्यांना दृढ विश्वास आहे की, या स्लम सॉकर स्पर्धेसाठी लवकरच प्रयोजक मिळेल.