नागपूर -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघ शिक्षा वर्ग-तृतीय वर्षाचा शुभारंभ आज (सोमवारी) नागपूरच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन ( Sangh Shiksha Varg Dr. Hedgewar Smriti Bhavan Nagpur ) परिसरातील महर्षी व्यास सभागृहात झाला आहे. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी ( Bhaiyaji Joshi ) यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले. यावेळी सहसरकार्यवाह राम दत्तजी, सहसरकार्यवाह मुकुंद उपस्थित होते.
संघाच्या प्रणालीत तृतीय शिक्षा वर्गाचे महत्त्व अधिक आहे. येथे येणाऱ्या शिक्षार्थींची भाषा वेगवेगळी असली तरी हृदय एक आहे. त्यामुळे संवाद साधण्यात कुठलीही अडचण जात नाही. हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. संघ शिक्षा वर्ग हा गंगोत्रीप्रमाणे आहे. गंगेतून कुणी कितीही पाणी घेतले तरी ते संपत नाही. त्याचप्रमाणे शिक्षा वर्गातून जितके ज्ञान घ्याल तितके कमीच आहे. शिक्षार्थ्यांची स्वतःचे विचार, कार्य यावर श्रद्धा असायला हवी. श्रद्धा आणि समर्पणासह साधना करत प्रत्येक शिक्षार्थीने संघाच्या कल्पनेतील कार्यकर्ता होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख तसेच वर्गाचे पालक अधिकारी मंगेश भेंडे यांनी देशभरातील सर्व प्रांतांमधून आलेल्या शिक्षार्थींना केले आहे.