नागपूर - गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार ( Rape In Nagpur ) केल्याची घटना नागपूरात घडली आहे. पीडित तरूणी गेल्या महिन्यात २२ तारखेला आरोपीने नागपूरात बोलावले होते. त्यावेळी त्यांने मी सैन्य दलात मोठा अधिकारी आहे. माझी पोस्टींग जम्मू काश्मीरमध्ये असल्याची बतावणी करीत थेट पीडितेला एका हॉटेलमध्ये नेले. तिथे कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार ( raped by giving gungi medicine ) केला. सैन्य दलात मोठा अधिकारी ( army senior officer ) असल्याचे सांगून नागपूरच्या एका भामट्याने अमरावती येथील एका तरुणीला प्रेम जाळ्यात अडकवले. त्यानंतर सलग तीन दिवस त्या तरुणीवर बलात्कार ( Raped for three consecutive days ) केला. पीडित तरुणीला आरोपीचा डाव समजल्यानंतर अमरावती येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, मूळ घटनास्थळ नागपूर असल्याने तक्रार नागपूर येथील सीताबर्डी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. पोलिसांनी अर्जुन कांबळे उर्फ शिवा कदम विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीला अर्जुनची फ्रेंड रिक्वेस्ट -या प्रकरणातील पीडित फिर्यादी ही २१ वर्षांची आहे. ती मूळची अमरावती जिल्ह्यातील आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव अर्जुन कांबळे आहे. काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीला अर्जुनची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. मुलीने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर आरोपी अर्जुनने मी सैन्यात कमांडो असून जम्मू-काश्मीरमध्ये पोस्टिंग झाल्याची माहिती त्याने दिली. नागपूरमध्ये मोठी संपत्ती असल्याचे त्या तरुणीला त्यांने सांगितले होते. हळू हळू दोघांमध्ये चांगली ओळख झाल्यानंतर आरोपीने विद्यार्थिनीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
गुंगीचे औषध देऊन बलात्कार -गेल्या महिन्यात २२ तारखेला पीडित तरूणी नागपुरात आली होती. त्यावेळी आरोपी तिला मी जम्मू काश्मीरमध्ये असल्याची सैन्यात नोकरी करीत असल्याचे सांगितले. माझा मित्र शिवा बसस्टॉपवर घेण्यासाठी येईल असे पीडित तरुणीला सांगितले. त्यानंतर शिवाने त्या तरुणीला थेट एका हॉटेलमध्ये नेले. तिथे आरोपींनी कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला.