महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rampwalk : नागपुरात तृतीयपंथींयांच्या रॅम्‍प वॉकचे आयोजन - तृतीय लिंग पंथ

नागपुरात पियू मेकओव्हर ( Pew makeover ) तसेच गौरव ट्रस्टतर्फे तृतीय पंथींयांचे ( Third gender sects ) रॅम्‍प वॉकचे ( Rampwalk ) आयोजन करण्यात आले होते. यावेळी तृतीयपंथीच्या रॅम्‍पवॉकला वागरिकांनी टाळ्यांचा प्रतिसाद दिला. तृतीय पंथ्यांना मॉडेलिंगच्या क्षेत्रातही ( Modeling field ) काम करता येते. महिलांच्या सौंदऱ्यात भर घालणाऱ्या मेकअप आर्टीस्ट ( Makeup artist ) म्हणून काम करू अशी संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम अमृतभवन येथे घेण्यात आला.

Rampwalk organized by PEU Makeover
PEU Makeover द्वारे आयोजित रॅम्पवॉक

By

Published : Jul 16, 2022, 4:07 PM IST

नागपूर- तृतीय पंथीयांचे ( Third gender sects ) सुद्धा रक्ताचा रंग लाल आहे. पण, आमच्याकडे त्यांना हीन पद्धतीने का पाहिले जाते. त्यांनाही सन्माने जगण्याचा अधिकार आहे, हाच संदेश देण्यासाठी पियू मेकओव्हरतर्फे तसेच गौरव ट्रस्टतर्फे तृतीय पंथींयांचे रॅम्‍प वॉकचे ( Rampwalk ) आयोजन नागपूरात करण्यात आले होते. तृतीय पंथ्यांना मॉडेलिंगच्या क्षेत्रातही ( Modeling field ) काम करता येते. महिलांच्या सौंदऱ्यात भर घालणाऱ्या मेकअप आर्टीस्ट ( Makeup artist ) म्हणून काम करू अशी संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम अमृतभवन येथे घेण्यात आला. यावेळी तृतीयपंथीच्या रॅम्‍पवॉकला टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. यात वधूचे खास मेकपास कसे असतात हे प्राथमिक स्तरावर प्रशिक्षण म्हणून त्यांना दाखवण्यात आले.

तृतीय पंथ

संधी उपलब्ध करून द्यायला हवी -तृतीय पंथीमध्ये अनेक कौशल्य आणि गुण असतात. यात कोणी गाणं म्हणण्यात कलापूर्ण असते तर, कोणी आणखी आपली कला सादर करण्यात निपुन असते. पण त्याना ना कोणी शिकवायल तयार असते ना त्यांना संधी उपलब्ध करून द्यायला. पण, नागपूरच्या प्रसिद्ध मेकअप आर्टीस्ट यांनी पुढाकार घेत एक पाऊल उचलले. यामध्ये तृतीय पथीयांना मेकअप आर्टीस्ट करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. यामध्ये त्या स्वखर्चाने त्यांना एक महिन्याचे मोफत प्रशिक्षण देऊन प्रोफेशनल पद्धतीने मेकअप आर्टीस्ट कसे काम करतात याचे पूर्ण ज्ञान देण्याचा मानस पियू मेकओव्हरच्या संचालिका पूनम भवसार यांनी व्यक्त केला आहे.

नागपुरात तृतीय पंथींयांच्या रॅम्‍प वॉकचे आयोजन

हेही वाचा -State Cabinet Meeting : औरंगाबाद आणि उस्मानाबादचे पुन्हा नामांतर, नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव

PEU Makeover आयोजित रॅम्पवॉक

आम्हाला संधी दिल्याचा आनंद -समाजात तृतीयपंथी याना इतरांप्रमाणेच चांगले स्थान मिळावे यासाठी अनके सामाजिक संघटना काम करतात. पण, शासन स्तरावरून फारसे काही प्रयत्न होत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. गौरवट्रस्टच्या अध्‍यक्षा तसेच ट्रान्‍समॉडेल विजेता शनाया पखाले यांच्‍यासह 40 पेक्षा जास्त तृतीय पंथींयांनी यात सहभाग नोंदविला. तसेच यातील 16 जणींनी रॅम्पवॉक करून नागपुरकरांचे लक्ष वेधले. आजपर्यंत अनेक रॅम्पवॉक पाहिले असतील, पण हा रॅम्पवॉकला लोकांचा टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आम्‍हालासुद्धा इतरांसारखी काही करून दाखवण्‍याची संधी मिळायला हवी. असे, म्हणत ही संधी नागपूरकरांनी दिली त्‍याबद्दल शनाया पखाले यांनी आनंद बोलून दाखवला.

भविष्यात चांगली मेकअप आर्टीस्ट तयार होईल -यावेळी बोलताना पूनम भवसार यांनी समाजात मानाचे स्‍थान मिळवून द्यायचे असा संकल्प घेतला आहे. याट्रान्सजेंडर यांना मुख्‍य प्रवाहात कसे आणता येईल हा याकार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. आज प्रत्‍येक गोष्‍ट शिकायला गेले तर पैसे लागतात. पण यांना माेफत एक महिना मेकअप आर्टीस्ट म्हणून प्रशिक्षण देणार आहे. यांच्‍याकरिता जे शक्‍य होईल ते करण्याचा प्रयत्न आहे. आशीर्वाद देण्यासाठी आपण तृतीयपंथी यांना बोलावतो पण जेव्हा काम करण्याची संधी द्यायची झाले तर तसे होत नाही. म्हणून या प्रोफेशनमध्ये त्याना संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रयत्न होता. यातून भविष्यात चांगली मेकअप आर्टीस्ट तयार होईल यात शंका नसल्याचे पूनम भवसार बोलतांना म्हणल्या.



हेही वाचा -Ajit Pawar In Baramati : मुख्यमंत्री थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय करा- अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details