नागपूर -येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजप-सेना युतीसोबत आहोत. मात्र, आम्ही कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार नाही, अशी भूमिका रिपाई अध्यक्ष मंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे. येत्या विधानसभेसाठी आम्हाला १० जागा हव्या आहेत, तशी मागणी युतीला केल्याचे देखील त्यांनी सांगितले.
'आम्ही युतीसोबत मात्र कमळावर निवडणूक लढवणार नाही'
आम्ही युतीसोबत आहेत. मात्र, रिपाई कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, असे अध्यक्ष रामदास आठवले यानी स्पष्ट केले.
आम्ही युती सोबत मात्र कमळावर निवडणूक लढवनार नाही- रामदास आठवले
तसेच विरोधकांना मोदींचा विरोध करायला ठोस कारण सापडत नसल्याने ते आता ईव्हीएमचा विरोध करत आहेत. लोक मोदींच्या सोबत आहेत. म्हणून बॅलेट पेपरवर निवडणूक झाली की युती जिंकेल असे त्यांनी सांगितले. सोबतच युती विधानसभा जिंकेल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.