नागपूर -गेल्या काही दिवसांपासून हिजाब प्रश्नावर मोठा वादंग निर्माण झाला ( Hijab Controversy ) आहे. याबाबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना विचारले असता त्यांचा गोंधळ उडाल्याचे दिसून ( Ramdas Athawale Statement On Hijab Controversy ) आले. त्यानंतर त्यांनी बाजूच्या व्यक्तीला विचारून शाळेत बुरखा नसावा, असे उत्तर दिले आहे. नागपुरात हा प्रसंग घडला आहे.
रामदास आठवले यांनी पत्रकार भवनात माध्यमांशी संवाद ( Ramdas Athawale In Nagpur ) साधला. यावेळी पत्रकारांनी हिजाब संदर्भात रामदास आठवले यांना प्रश्न विचारला. तेव्हा ते गोंधळल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी शेजारी बसलेल्यांना विचारले. मग रामदास आठवले म्हणाले की, "शाळेचा ड्रेस कोडमध्ये बुरख्याची पद्धत नसावी. मुस्लिम धर्मात जरी बुरखा घालण्याची पद्धत असली तरी बाजारात किंवा बाहेर जाताना घालतात ते ठीक आहे. पण शाळेत बुरख्याची पद्धत नसावी," असे आठवले यांनी सांगितले.