नागपूर- सातारा-सांगली-कोल्हापूर या नद्यांवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरील भरावामुळे यावर्षी सीमा भागांमध्ये मोठ्या प्रमाणात महापुराने थैमान घातले. पुणे-बंगळुरू व रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील पेठ नाका ते बेळगांव जिल्ह्यातील हत्तरकी टोल नाका व आंबा घाटापासून ते मिरज शहरापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गांच्या नद्यांवरील पुलामुळे घडलेल्या प्रकाराबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन चर्चा केली. त्यांनीही लगेच यासंदर्भात अभ्यास करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्यात.
राष्ट्रीय महामार्गांच्या नद्यावरील पुलालगतच्या भरावामुळे यावर्षी कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्याच्या सीमा भागामध्ये महापुराने थैमान घातले होते. तसेच पाणीपातळी वाढून ते नागरी वस्तीत शिरले. पाणी कमी होण्यास वेळ लागल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सांगली, कोल्हापूर व बेळगांव जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा करत असताना नागरिकांनी शेतकऱ्यांच्या पुलाच्या भरावामुळे निर्माण झालेली परिस्थिती निदर्शनास आणून दिली. या तीनही जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा आणि हिरण्यकेशी नद्यांवरील पुलांचा भराव कमी करून दोन्ही बाजूस दोन दोन कमानीचे बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहित होईल असे चर्चेदरम्यान सांगण्यात आले.
...यामुळे पावसाचे पाणी मंदावले -
या पावसाचे पाणी कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा आणि हिरण्यकेशी या नद्यांवर पूल बांधण्यात आले. या राष्ट्रीय मार्गावरील पुलांचे निर्माण कार्य करतांना दोन्ही बाजूने जवळपास 2 किलोमीटर भराव देण्यात आला आहे. जेव्हा महापूर येतो तेव्हा नद्यांच्या पात्राबाहेर पाऊस दोन पाणी वाट शोधत पसरत जाते. पण पूल बंधा-याचे काम करतात. म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत गती मंदावली आहे.