नागपूर -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तब्येत बिघडल्यामुळे सोलापुरातील नियोजित कार्यक्रम रद्द करुन ते नागपूरला परत आले. यावेळी विमानतळावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि त्यांची भेट झाली. सिंह यांनी गडकरींच्या तब्येतीची विचारपूस केली.
नितीन गडकरी अन् राजनाथ सिंग यांची नागपूर विमानतळावर भेट, राजनाथ यांनी केली तब्येतीची विचारपूस - Meet Rajnath Singh and Nitin Gadkari
नागपूर विमानतळावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नितीन गडकरींची भेट घेतली. यावेळी राजनाथ यांनी गडकरींच्या तब्येतीची विचारपूस केली.
![नितीन गडकरी अन् राजनाथ सिंग यांची नागपूर विमानतळावर भेट, राजनाथ यांनी केली तब्येतीची विचारपूस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4012744-thumbnail-3x2-pawag.jpg)
नितीन गडकरींच्या तब्येतीची विचारपूस करताना राजनाथ सिंह
नागपूर विमानतळावर नितीन गडकरींच्या तब्येतीची विचारपूस करताना राजनाथ सिंह
अमरावती जिल्ह्याच्या गुरुकुंज मोझरी येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर परत जाण्यासाठी ते नागपूर विमानतळावर आले, याच वेळी गडकरी यांचे विमानही तेथे उतरले होते. त्यामुळे सिंग यांनी विमानतळावर थांबून गडकरींच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आशिष शेलारही तेथे उपस्थित होते.