नागपूर :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली (Raj Thackeray Vidarbha tour start today) आहे. आज सकाळी राज ठाकरे यांचे विदर्भ एक्सप्रेसने नागपूरच्या रेल्वे स्थानकावर आगमन झाले आहे. त्यांच्यासोबत मनसेचे नेते आणि पदाधिकारी आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी नागपूरसह विदर्भातील शेकडो कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते. राज ठाकरे नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकचं जल्लोष केला. (municipal elections in vidarbha )
राज ठाकरे पुढील ५ दिवस विदर्भात मुक्कामी असणार आहेत. यादरम्यान ते नागपूर, चंद्रपूर तसेच अमरावती शहराचा दौरा करणार ( Raj Thackeray plan strategy municipal elections ) आहेत. आगामी काळात विदर्भातील तीन शहरातील महानगरपालिका निवडणूकांच्या होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्याचे नियोजन केले आहे.
रेल्वे स्टेशन ते हॉटेल पर्यत राज यांची रॅलीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. आज राज ठाकरेंचे नागपुरात आगमन झाल्यानंतर रेल्वे स्टेशन ते मुक्कामी असलेल्या हॉटेलपर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
असा आहे, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा शेड्युलराज ठाकरेंचे आज नागपूरला झाले आहे. आता पुढील दोन दिवस (१८,१९) नागपूरच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनंतर २० सप्टेंबरला राज ठाकरे चंद्रपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे सुद्धा कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांचे मार्गदर्शन करतील अशी माहिती आहे. २१ सप्टेंबरला चंद्रपूरवरून अमरावतीला रवाना होतील. २१ आणि २२ सप्टेंबर रोजी ते अमरावती येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यानंतर ते २२ सप्टेंबरला रात्री अमरावती येथून मुंबईकडे प्रयाण करतील. (Vidarbha tour start)