नागपूर- केंद्रीय मंत्री असल्याने आज सुरक्षेचा फौजफाटा असला तरी भाजप पक्षाला सोनेरी दिवस येण्यापूर्वीच संघर्षमय इतिहास सांगताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक किस्सा सांगितला. त्यात आंदोलनात पोलिसांनी इतके मारले होते की रक्ताच्या उलट्या होऊन रक्तबंबाळ झाले असल्याच ते सांगत होते. ते नागपूरात दिवाळी मिलननिमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. विधानपरिषदेचे आमदार गिरीश व्यास यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांनी कार्यकाळाच्या अहवाल पुस्तिकेचे लोकार्पण सुरेश भट्ट सभागृहात केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले की, भाजपाला आज सोनेरी दिवस पाहायला मिळत आहे. त्यावेळचे मोजकेच लोक आज आहे. तो काळ संघर्षाची होता. पण कार्यकर्ते जुने झाले की मोडीत निघतात, पण भाजपी पक्षात तसे होत नाही असेही गडकरी म्हणाले.
कार्यकर्ता चतूर हवा, चत्रा नको -
भाजपमध्ये आज चांगले दिवस आले आहे. त्या काळात अनेक पदाधिकारी यांनी घेतल्या संघर्षमय परिश्रम त्यामुळे पायावर उभा झाला. त्यामुळे आज भाजप पक्षाला चांगले दिवस आलेत. पण हे चांगले दिवस ज्यांच्यामुळे आले तेही विसरू नये असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. गिरीश व्यास यांच्या विधान परिषदेचे कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांनी अहवाल पुस्तिका सादर करतांना त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामाची आठवण गडकरी यांनी करून दिली. त्यांचे पक्षासाठी कामाचे योगदान पाहता त्यांना आमदारकी दिली. त्यांनी आमदारकीची तिकीट मागितली नव्हती. आम्ही एका कार्यकर्त्यावर त्याचा कामाची चीज केली आणि आम्ही ती चूक केली असे झाले असते. त्यामुळे गिरीश व्यास यांना आमदारकी देण्यात आली. आज जो प्रामाणिकपणे गिरीश व्यास यांच्यामध्ये आहे, तो आजच्या राजकारणात नसते असेही ते म्हणाले. तसेच कार्यकर्ता चतुर असला पाहिजे पण चत्रा नको, गिरीश व्यास यांनी एका कार्यकर्त्यांच्या कसोटीत राहून काम केले.