महाराष्ट्र

maharashtra

METRO GIRL NIKITA MAHAJAN: हजारो प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवणारी...आधुनिक नवदुर्गा मेट्रोगर्ल निकिता महाजन

By

Published : Sep 28, 2022, 6:03 AM IST

नवरात्रोत्सवानिमित्त (navratri festival) आपल्या क्षेत्रात कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशस्वी महिलांची यशोगाथा (Success stories of successful women) आणि त्यामागील संघर्ष ईटीव्ही भारतने आपल्यासमोर आणला आहे. नागपूर जिल्ह्यातील पहिली मेट्रोगर्ल म्हणून नाव कमावणाऱ्या निकिता महाजन (Metrogirl Nikita Mahajan) यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा जाणून घेऊयात.

METRO GIRL NIKITA MAHAJAN
हजारो प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवणारी...आधुनिक नवदुर्गा मेट्रोगर्ल निकिता महाजन

नागपूर:आदिशक्ती मातेच्या नवरात्र उत्सवाला (navratri festival) आता दणक्यात सुरुवात झाली आहे. या निमित्ताने आपल्या क्षेत्रात कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशस्वी महिलांची (Modern Navdurga) यशोगाथा आणि त्यामागील संघर्ष ईटीव्ही भारतने तुमच्यासमोर आणला आहे. नागपूर जिल्ह्यातील पहिली मेट्रोगर्ल म्हणून नाव कमावणाऱ्या निकिता महाजन यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा जाणून घेत आहोत. निकिता दुर्गेश महाजन (Metrogirl Nikita Mahajan) ही नागपूर मेट्रो ट्रेनची (nagpur metro) पहिली महिला चालक म्हणून आता सर्व नागपूरकरांच्या परीचयाची झाली आहे. शेकडो प्रवाश्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळणाऱ्या निकिताने कधीही मेट्रो चालक होण्याचे स्वप्न बघितले नव्हते. मात्र, ज्यावेळी तीने या क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हापासुन प्रवासी सुरक्षा सर्वतोपरी या सूत्राचे पालन करत; ती यशस्वीपणे गेल्या साडेतीन वर्षांपासून मेट्रो ट्रेन चालवत आहे.

हजारो प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवणारी...आधुनिक नवदुर्गा मेट्रोगर्ल निकिता महाजन

निकिता दुर्गेश महाजन या मूळच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील रहिवासी आहेत. सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या निकिता यांनी किट्स कॉलेज रामटेक येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंचे शिक्षण पूर्ण केले आहे. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर पुढचे शिक्षण घ्यावे की नोकरी करावी या दुविधेत असताना, त्यांच्या हाती मेट्रोची एक जाहिरात पडली. खऱ्या अर्थाने त्या जाहिरातीमुळे निकिताच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली.

मेट्रोची परीक्षा केली उत्तीर्णनिकिता नोकरीच्या शोधात होत्या. त्यादरम्यान वर्तमानपत्र चाळत असतांना महा-मेट्रोने विविध पदाच्या भर्तीसाठी दिलेली जाहिरात त्यांच्या दृष्टीत पडली. त्यांनी मेट्रोची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने निकिताने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासला सुरुवात देखील केली. नोकरीसाठी जीवनातील पहिली परीक्षा देताना मनावर कोणतेही दडपण न येऊ देता; त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला. बघता बघता परीक्षा झाली आणि निकिता त्यात उत्तीर्ण देखील झाल्या. त्यानंतर त्यांची निवड ही मेट्रो ट्रेन ऑपरेटर (Metro train operator) म्हणून झाली. तेव्हापासून निकिताने मागे वळून बघितले नाही.

प्रवासी सुरक्षा सर्वतोपरीमेट्रो ट्रेनच्या चालक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रवासी सुरक्षा सर्वतोपरी, या सूत्रानुसारचं काम करावे लागते. प्रत्येक वेळी शेकडो प्रवाशांना सुखरूप एका स्टेशनवरून त्यांच्या गंतव्य स्थानावर पोहचणे, हे अत्यंत जबाबदारीचे काम असल्याची जाणीव निकिताला आहे.

मेट्रोच्या मदतीशिवाय हे अशक्यमेट्रो ट्रेनचे परिचलन करण्याच्या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी आहे, असा समज होता. मात्र, निकिताने पुरुषांची मक्त्तेदारी मोडीत काढत, आपल्या कार्य-कर्तृत्वाचा ठसा या क्षेत्रात उमटवला आहे. निकिताला आदर्श मानून अनेक तरुणींना या नाविन्यपूर्ण क्षेत्रात आपले करिअर घडवण्याची इच्छा आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी अगदी यशस्वीपणे त्या पार पाडत आहेत. सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांमुळेच मी इथं पर्यंत मजल मारू शकले, असे निकिता म्हणाल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details