नागपूर - दोन दिवसांपूर्वी नागपूर शहर पोलीस दलातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत असल्याने थेट पोलीस आयुक्तांनीच आता पुढाकार घेतला आहे.
"पोलीस कर्मचाऱ्यांना १ तासात बेड उपलब्ध करा", आयुक्तांच्या ऑडिओ क्लिपची नागपुरात चर्चा - आयुक्तांची ऑडिओ क्लिप वायरल
नागपूरचे नवे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चर्चेत आली आहे. यात ते कोरोनाबाधा झालेल्या पोलिसांना बेड मिळत नसल्यामुळे भडकलेले दिसतात.
नागपूरचे नवे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. त्यामध्ये पोलीस आयुक्त अमितेशकुमार कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात बेड न मिळण्याबाबत संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करीत असल्याचे दिसून येते.
शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नागपुरातील कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याबद्दल, संबंधित क्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांना वायरलेस मेसेज केला होता. त्यावेळची ही ऑडिओ क्लिप असून त्यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी सुनावत आहेत.