नागपूर -मार्च महिना संपण्यापूर्वीच तापमानाचा पारा 42 अंशावर गेला असल्याने यावर्षीचा उन्हाळा नागपूरकरांना अत्यंत जड जाईल, अशीच शक्यता निर्माण झाली आहे. उन्हामुळे दुपारच्या वेळेत तर घराबाहेर पडणे देखील कठीण झाल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी झालेली आहे. अशा परिस्थिती पशु, पक्षी आणि वन्य प्राण्याची काय अवस्था होत असेल? हीच बाब लक्षात घेऊन नागपूरच्या प्रसिद्ध महाराजबाग प्राणी संग्रहालयात ( Maharajbagh Zoo Nagpur ) वन्य प्राण्यांच्या शरीराचे तापमान सामान्य ठेवण्याच्या उद्देशाने कुलरची व्यवस्था ( Cooler for wildlife ) करण्यात आली आहे. साध्य बिबट, अस्वल आणि चिडिया घरात कुलर बसवण्यात आले असून वाघांसाठी त्यांच्या पिंजऱ्यात छोटे छोटे तळे तयार करण्यात आले आहेत.
प्राण्याची विशेष काळजी :एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, या पार्श्वभूमीवर महाराजबाग प्राणी संग्रहालयच्या व्यवस्थापकांनी भीषण गर्मीत प्राणांना गार-गार वाटावे या करिता विशेष व्यस्था केली आहे. सध्या चार कुलर लावण्यात आले असून गरज भासल्यास कुलरची संख्या वाढविण्यासाठी येईल. याशिवाय सर्वच प्राण्यांच्या बॅरेकला ग्रीन नेटने कव्हर करण्यात आले आहे, तर प्राण्याच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी प्राण्यांना जुसी फ्रुट, ग्लुकोज दिले जात असल्याची माहिती महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे अधिकारी अभिजित मोटघरे यांनी दिली आहे.