नागपूर - नागपूर मेट्रो रेल्वे प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यातील काम आता पूर्णत्वाकडे जात आहे. ऑरेंज लाईनवरील सीताबर्डी ते खापरी आणि एक्वा लाईनवरील सीताबर्डी ते लोकमान्य नगर हिंगणापर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही मार्गांवर गेल्या दीड वर्षांपासून मेट्रो धावत आहेत. आता रीच 4 (सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर) मार्गिकेवर ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि एकूण 0.5 किलोमीटरचे फक्त 2 पॅच शिल्लक आहेत. या रीचवरील ट्रॅकची एकूण लांबी 8.0 किमी आहे. प्रजापती नगर आणि गड्डीगोडम भागात काम सुरू आहे. कामठी आणि पारडी मार्गावरील उर्वरित सुरू झाल्यानंतर नागपुरात मेट्रोचे जाळ तयार होणार आहे.
नागपूर मेट्रोची प्रगती; रीच 4 वर ट्रॅक बसवण्याचे कार्य पूर्णत्वाकडे, अंतिम 0.5 किमीवरचे काम सुरू - Metro Track installation
नागपूरातील रीच 4 (सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर) मार्गिकेवर ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि एकूण 0.5 किलोमीटरचे फक्त 2 पॅच शिल्लक आहेत. या रीचवरील ट्रॅकची एकूण लांबी 8.0 किमी आहे. प्रजापती नगर आणि गड्डीगोडम भागात काम सुरू आहे. कामठी आणि पारडी मार्गावरील उर्वरित सुरू झाल्यानंतर नागपुरात मेट्रोचे जाळ तयार होणार आहे.
रुळांच्या मीटरच्या बाबतीत विचार केल्यास रीच ४ ची अप आणि डाऊन या दोन्ही मार्गिकांची लांबी 16,050 मीटर आहे जी फक्त 1,008 मीटर शिल्लक आहे आणि काम गतीने प्रगतीपथावर आहे. रीच ४ वरील व्हायाडक्ट, स्टेशन्स, ट्रॅक, ओव्हरहेड इलेक्ट्रिकल (ओएचई), सिग्नलिंग इत्यादींचे काम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांनी हिरवा सिग्नल दिल्यावर या मार्गिकेवर गाड्या धावू लागतील. रीच ४ हे नागपूरमधील इतवारी, गांधीबाग, सेंट्रल एव्हेन्यू इत्यादी शीर्ष व्यावसायिक भागांना उर्वरित शहराशी जोडेल. तसेच शहरातील अव्वल व्यावसायिक क्षेत्रांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (आयजीजीजीसीएच) (मेयो हॉस्पिटल), नागपूर रेल्वे स्थानक, संत्रा मार्केट, शहरातील मुख्य फळ बाजार, महात्मा फुले मार्केट, गांधीबाग, मस्कासाथ आणि इतवारी घाऊक बाजारपेठ आणि सेंट्रल एव्हेन्यू या प्रमुख व्यावसायिक क्षेत्रांपैकी एक असलेल्या मार्गिका यांना स्वस्त आणि जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाईल.
रीच ४ वरील स्थानके -
कॉटन मार्केट, नागपूर रेल्वे स्टेशन, दोसर वैश्य चौक, अग्रसेन चौक, चितार ओली, टेलिफोन एक्स्चेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णो देवी चौक आणि प्रजापती नगर आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत हा मार्ग परिवहन नगर, कापसी पर्यंत जाईल.