महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Faculty Unemployment : डॉक्टरेट प्राध्यापकांवर हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ; नेट सेट धारकांचा प्रश्न गंभीर - Faculty recruitment

मागील 12 वर्षांपासून प्राध्यापक भरती ( recruitment of professors closed for many years ) न झाल्याने अनेकजण बेरोजगार ( NET- SET HOLDER UNEMPLOYED ) आहे.उच्चशिक्षित होण्यासाठी वर्षांनो वर्ष संशोधन ( Research ) करत साहित्याला समृद्ध करत उद्याच्या पिढीला विचारांची शिदोरी देणाऱ्या प्राध्यापकांवर ( problem of unemployment of professors) हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे.

Dr. Pramod Lende
डॉ. प्रमोद लेंडे

By

Published : Aug 6, 2022, 10:59 PM IST

Updated : Aug 8, 2022, 9:17 AM IST

नागपूर - मागील 12 वर्षांपासून प्राध्यापक भरती न झाल्याने अनेकजण बेरोजगार ( problem of unemployment of professors) आहे. उच्चशिक्षित होण्यासाठी वर्षांनो वर्ष संशोधन ( Research ) करत साहित्याला समृद्ध करत उद्याच्या पिढीला विचारांची शिदोरी देणाऱ्या प्राध्यापकांवर हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. उद्याची पिढी घडवण्याची जवाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांनाचा जगण्यासाठी वनवन फिरावे लागत असेल तर शिक्षणाने समाज समृद्ध होतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नोकरीसाठी 40 ते 45 लाख संस्थाचालकाच्या घशात - प्राध्यापक, पीएचडी धारक ( PhD holder ) वर्षोनुवर्षे संशोधन करून डॉक्टरेट डिग्री ( Doctoral degree ) मिळवतात. शैक्षणिकच नाही तर, सामाजिक क्षेत्रात मानाची समजली जाणारी पदवी पीएडी धारकांना देतात. पण मागील 12 वर्षांपासून प्राध्यापक भरती न झाल्याने अनेकजण बेरोजगार आहे. तेच काही जण सेट नेट ( NET- SET HOLDER UNEMPLOYED ) सारख्या स्पर्धात्मक परीक्षा ( Competitive Examination ) पास होऊन आपली पात्रता सिद्ध करतात. मात्र प्राध्यापक भरती न झाल्याने अनेकांनवर बेरोजगारीची कुऱ्हाड ( Unemployment ax on professors ) कोसळली आहे. यात काहींना कंत्राटी काम मिळाले आहे. पण, यातून मिळणारे तुटपुंजे मानधन ( Meager remuneration to professors ) पाहता त्यात संसाराचा गाडा कसा ओढायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे त्याच्यावर मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. अनेक प्राध्यापकांनी संस्थाचालकांना 40 ते 45 लाख रुपए देवून सुध्दा तटपूंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. काही पीएचडी धारकांनी वडिलोपार्जित शेती विकून प्राध्यापक पदासाठी पैसे संस्थाचालकांना पैसे दिले आहेत. मात्र, त्यांना अजूनही रुजू करण्यात आलेले नाही. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील प्राध्यपकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

डॉ प्रमोद लेंडे

पैसे नसलेल्या बापाची हतबलता..डॉ प्रमोद लेंडे ( Dr. Pramod Lende ) यांनी मराठीचे कवी ग्रेस ( Poet Grace ) यांच्या 'समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास' करून नागपूर विद्यापीठात ( Nagpur University ) महाराष्ट्रात पहिल्यादा संशोधन केले. तब्बल 10 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली. मात्र, मागील 12 वर्षांपासून भरती प्रक्रिया राबवली नसल्याने त्यांना कंत्राटी पद्धतीने तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. यातही मानधन हे वेळेवर मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुलांच्या उपचरांसाठी लागणारे पैसे बाप म्हणून माझ्या जवळ नव्हते, ही हतबलता या व्यवस्थेमुळे निर्माण झाल्याचे दुःख प्राध्यापक डॉ प्रमोद लेंडे यांनी व्यक्त केली.

तुटपुंजे मानधनामुळे टेक्निशियन..प्राध्यापकांना मानधन मिळत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालावा असा प्रश्न सेट-नेट धारक प्राध्यपकांना पडला आहे. ही भावना एका प्राध्यापकाची नासून अनेक प्राध्यापकांची आहे. बहुतांश प्राध्यापकांची अशीच वाईट अवस्था असल्याचे प्राध्यापक असलेले शिवाजी घरडे ( Shivaji Gharde ) यांनी सांगितले. नागपुरातील एक तालुक्याच्या ठिकाणी सध्या ते एक तासिका प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. पाच सहा हजार रुपये मिळत असल्याने शेती करतात. मात्र, त्यांनी लॉकडाऊनच्या ( Lockdown ) काळात रुग्णलयात एक्सरे टेक्निशियन ( X-ray technician ) म्हणून कोर्स केला. सध्या जरी पात्रता प्राध्यापकांची असली तरी, ते एका खाजगी रुग्णालयात काम करत आहे. यातून मिळणाऱ्या पगारातू आपला संसाराचा गाढा चालवत आहे असल्याची दुखद कथा त्यांनी सांगितली.

हेही वाचा -Jagdeep Dhankhar : कोण आहेत जगदीप धनखड.. जाणून घ्या शिक्षण, व्यवसाय आणि राजकीय कारकीर्द..

डॉक्टरेट पण हॉटेलात काम..यात नागपूरचे असलेले डॉ.राजेंद्र तांबे ( Dr. Rajendra Tambe ) हे वयाच्या पन्नाशीच्या दिशेने वाटचाल करत आहे. इकॉनॉमिक ( economic ) हा त्यांचा विषय. ते सकाळी एका महाविद्यालयात शिकवतात. मात्र, स्वतःच्या घराचे आर्थिक गणित सांभाळण्यासाठी त्यांना एका हॉटेलात काम करावे लागते. कधी वेटर तर, कधी मजूर असे त्यांनी काम केले आहे. सध्या ते हॉटेल व्यवस्थापक म्हणुन काम करत आहे. पण 13 वर्षांपूर्वी त्यांनी 'नागपूर जिल्ह्यातील मध्यम व लघु सिंचना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याचे आर्थिक अध्ययन' या विषयाला धरून डॉक्टरेट मिळवली. त्यांनी सिंचनाचा अभ्यास केला खरी मात्र, त्यांचे आर्थिक उथ्थान कधी झालेच नाही. शिक्षणाची आवड जोपासत असतांना त्यांच्या हाती फार काही लागले नसल्याचे दुःख त्यांच्या मनात आहेत. कॉलेजच्या वयात काम करतांना लाज कशाची या उद्देशाने त्यांनी जगण्यासाठी सुरू केलेला संघर्ष आजही सुरू आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न..प्राध्यापकाना तासिका तत्वावर तुटपुंजे मानधन मिळते. यातच शासन निर्णयाने तासिका प्राध्यापकांवर अन्याय झाल्याचे ते सांगतात. पूर्वी एका प्राध्यापकाला एकाचवेळी अनेक ठिकाणी काम करता येत होते. पण शासनाच्या नव्या निर्णयाने अन्याय झाला. एकाच महाविद्यालयात काम करणे बंधनकारक केले. दुसरीकडे 2 हजार जागा काढून सुद्धा भरती प्रक्रिया न राबवल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाला. पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात उच्च शिक्षित प्राध्यापकांची ही व्यथा अनेक प्रश्न व्यवस्थेसमोर उभे करत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अर्थकारण, राजकीय हस्तक्षेप शिक्षणाचा दर्जा उंचावेल की घटेल हे सुद्धा समजून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा -Grampanchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाची शिवसेनेवर मात?; राजकीय विश्लेषक म्हणाले, 'हे चित्र तात्पुरते...'

Last Updated : Aug 8, 2022, 9:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details