नागपूर:विदर्भ साहित्य संघाचे वर्तमान अध्यक्ष Manohar Mhaisalkar मनोहर म्हैसाळकर यांचे आज निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. वृद्धापकाळामुळे शुक्रवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
मनोहर म्हैसाळकर विदर्भासह महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील आदरणीय नाव आहे. मनोहर म्हैसाळकर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष म्हणून ते परिचित असले तरी उत्तम संघटक, व्यवस्थापक, खेळाडू, साहित्य व नाटकाचे जाणकारही आहेत. वयाच्या ९० व्या वर्षातही त्यांचा उत्साह दांडगा होता.
मनोहर म्हैसाळकर संघटक म्हणून साहित्य क्षेत्रातल्या दिग्गज लेखक आणि साहित्यिकांना सुत्रात बांधले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक Election of President of Sahitya Samela त्यांच्या शब्दाभोवताल फिरते, असा आजवरचा अनुभव आहे.
विदर्भ साहित्य संघाचे वर्तमान अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे शुक्रवारी सायंकाळी उपचारा दरम्यान निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.प्रकृती खालावल्याने दोनच दिवसांपूर्वी हाॅस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालावल्याची बातमी पुढे येताच साहित्य आणि राजकीय क्षेत्रातुन श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली - विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष श्री मनोहरराव म्हैसाळकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने केवळ एक उत्तम साहित्यिकच नाही, तर एक चांगला संघटक, व्यवस्थापक, खेळाडू आपल्यातून हिरावला गेला आहे अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. अनेक दिग्गज साहित्यिक आणि लेखकांना एका सूत्रात बांधण्याचे काम मनोहररावांनी केले. मनोहररावांचे आशीर्वाद असले की, साहित्यातील कुठलेही आयोजन यशस्वीच होते, अशी त्यांची ख्याती. आताही वर्ध्यातील आगामी 96 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. केवळ विदर्भ साहित्य संघच नव्हे,तर अनेक संस्थांशी त्यांचा अतिशय जवळून संबंध आला. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. संपर्कात आलेल्या अनेक संस्था त्यांनी वि.सा.संघाशी जोडल्या. या जाणकार साहित्यिकाचे निधन ही साहित्यजगताची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
साहित्य चळवळ विदर्भाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते - गडकरी :मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. मनोहरजी उत्तम संघटक आणि प्रशासक होते. साहित्य चळवळ विदर्भाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. विदर्भातील नाट्य चळवळीशी देखील त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती.
मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची अपरिमीत हानी:- सुधीर मुनगंटीवार
विदर्भ साहित्य संघाचे वर्तमान अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाने अभ्यासू वक्ता, भाषा अभ्यासक,सर्जनशील लेखक,अभ्यासक संशोधक हरपल्याची शोकभावना सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मनोहर म्हैसाळकर यांनी साहित्य क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. गेल्या १० वर्षा पासून त्यांनी विदर्भ साहित्य संघ अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. वाड्.मयाच्या क्षेत्रात त्यांनी आयुष्यभर मोलाचे योगदान दिले आहे. विदर्भ साहित्य संघ म्हणजे मनोहर म्हैसाळकर असे जणू समीकरणच बनले होते. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.