नागपूर :देशातील तिसावे राज्य विदर्भ राज्य असावे, या मागणीसाठी आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर मैदानात उतरले (Prashant Kishor statement on Mission 30) आहे. आज प्रशांत भूषण हे नागपुरच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भवाद्यांसोबतच राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील संपादकांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेत आहेत. यावेळी ते विदर्भाचा इतिहास आणि आंदोलनाची भूमिका समजून घेणार (Prashant Kishor on Vidarbha movement) आहेत. त्यानंतर ते वेगवेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला कोणत्या दिशेने नेता येईल, याकरिता रणनीती आखणार आहेत.
आज दिवसभर अनेकांशी ते सामोरा-समोर बसून चर्चा करतील. त्यानंतर पुढील आठवड्यात ते पुन्हा नागपुरला येणार आहेत, त्यावेळी आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मी केवळ समर्थन करू शकतो. माझे अनुभव सांगू शकतो जे काही करायचं आहे ते इथल्या लोकांना करायचे आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
प्रशांत किशोर यांची बैठक सुरू होण्याआधी वेगळ्या विदर्भाचे समर्थक आणि काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मिशन ३० वे राज्य विदर्भ हे कॅम्पेनिंग सुरू केले आहे. देशात २९ राज्य असून ३० वे राज्य विदर्भ असावे, अशी मागणी त्यांनी उचलून धरली आहे. विदर्भाच्या आंदोलनाची भूमिका समजून घेण्यासाठी प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वात नागपूरच्या चिटणवीस सेंटरमध्ये विदर्भवाद्यांची महत्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. माझं काम केवळ रणनीती ठरवायचे आहे, यावर पुढील काम विदर्भवादयांनाचं करावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केलं (Vidarbha movement) आहे.