नागपूर -नागपुरात एका जखमी तळीरामाने उपचार झाल्यानंतर चक्क रेनकोट समजून कोरोना वॉर्ड वापरण्यात आलेले पीपीई किट चोरले. ही खळबळजनक घटना समोर आल्यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये तो पॉझिटिव्ह सापडला आहे. हा संपूर्ण प्रकार मेयो रुगणालायत घडला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत
रेनकोट म्हणून दारुड्याने चोरली रुग्णालयात वापरलेली पीपीई किट, ठरला कोरोना पॉझिटिव्ह - नागपूर तळीराम कोरोना पॉझिटिव्ह
नागपुरात एका जखमी तळीरामाने उपचार झाल्यानंतर चक्क रेनकोट समजून कोरोना वॉर्ड वापरण्यात आलेले पीपीई किट चोरले. ही खळबळजनक घटना समोर आल्यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये तो पॉझिटिव्ह सापडला आहे. ते पीपीई किट घालून तो पावसातही फिरला.
दोन दिवसांपूर्वी दारू प्यायल्यानंतर एका मद्यपीला दुखापत झाली. त्याला उपचारासाठी शहरातल्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार झाल्यानंतर त्या मद्यापीने चक्क कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना वापरलेले पीपीई किट रेनकोट समजून चोरले आणि ते घरी घेऊन गेला. इतकेच काय तर, ते पीपीई किट घालून तो पावसातही निघाला. परिसरातल्या लोकांनी विचारणा केल्यानंतर आपण हा रेनकोट हजार रुपयांना विकत घेतल्याच्या थापा तो मारत होता. यादरम्यान परिसरातील काही लोकांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती प्रशासनाला दिली. त्यानंतर हा रेनकोट नसून पीपीई किट असल्याचे समजताच त्याची चौकशी करण्यात आली.
व्यवसायाने भाजीपाला विक्रेता असलेल्या या व्यक्तीने खरा प्रकार सांगताच सर्वांना धक्काच बसला. त्यानंतर चोरलेली पीपीई किट वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नष्ट करीत हा उपद्रव करणाऱ्या मद्यपीची कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याने ही पीपीई किट घरी नेल्याने त्याच्या कुटुंबीयांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. परंतु सुदैवाने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.