नागपूर - राज्यातील अनेक शहरात वाढत्या तापमानामुळे भीषण उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. यातच महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. विशेषत: मध्य नागपूर, पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपुरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut ) यांच्या शहरात मागील तीन दिवसंपासून संध्याकाळनंतर वीजपुरवठा खंडित ( Power outage Nagpur ) होत आहे. एकीकडे लोडशेडिंग नाही म्हणत असताना दुसरीकडे अखंडित वीज पुरवठासाठी सज्ज असल्याचा दावा करणारे वीज महावितरण ( MSEDCL ) त्यांच्याच शहरात फेल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Former Energy Minister Chandrasekhar Bawankule allegation ) यांनी नियोजचा अभाव असल्याने अघोषित भरनियमन सुरू असल्याचा आरोप केला आहे.
'या' आहेत अडचणी :मागील वर्षीच्या तुलनेत १०० मेगावॅट ६०० ते ६५० मेगावॅट एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे उष्णेतेने किंवा इतर कारणाने यंत्रणा नादुरुस्त होऊन एखाद्या ठिकाणाचा वीज पुरवठा बाधित झाला तर दुसरीकडून तो सुरळीत करण्यात येत होता. परंतु संपूर्ण यंत्रणेवर भार जास्त असल्याने नेहमीसारखे नियोजन करण्यास महावितरणला अडचणी जात असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.