नागपूर - महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायती ( Power cut villages Maharashtra ) आज अंधारात गेल्या आहेत. स्ट्रीट लाईट ( Street light power cut villages Maharashtra ) आणि पाणी पुरवठ्याच्या विद्युत बिलाची 8 हजार कोटींची थकबाकी असल्याने विद्युत पुरवठा खंडित केला आहे. यासाठी येणाऱ्या अधिवेशनात बजेटमध्ये वित्त मंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री यांनी निधी देऊन ग्रामपंचायतचे ( villages power cut Maharashtra news ) वीजबिल भरावे अशी मागणी राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule on power cut Maharashtra ) यांनी केली आहे. तेच राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी, हा विषय जिव्हारी लागला असून लवकरच राज्याचा मंत्री म्हणून यावर तोडगा काढू, अशी भूमिका घेतली. पण, जबाबदार मंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -Nitin Raut : 'दिल्लीतून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोना पसरला'
राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी तीन हजार कोटी रुपये निधी दिला जातो. त्या निधीतून ग्रामपंचायतचे स्ट्रीट लाईट आणि पाणी पुरवठ्याचे वीजबिल भरले जात होते. मात्र, मागील अडीच वर्षात सरकारने एकही रुपया न दिल्यामुळे 8 हजार कोटी रुपये ग्रामपंचायतवर थकबाकी झाली आहे. राज्यातील ग्रामपंचायतीची परिस्थिती पाहता हे वीजबिल भरू शकत नसल्यामुळे बजेटमध्ये निधी मंजूर करून वीजबिल भरावे, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
नागपूर जिल्ह्यातील सुमारे दोनशे ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटची वीजबिले थकीत असल्याने विद्युत कनेक्शन कापण्यात आले. यावर उत्तर देताना हा विषय नक्कीच जिव्हारी लागलेला असून प्रश्न लवकरच निकाली काढू, असे मत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे माध्यमांशी बोलताना म्हणाले.