नागपूर -covid-19 चे भयंकर परिणाम पोस्ट कोविडमध्ये दिसून आलेत. यातच नव्याने समोर येत असलेला पोस्ट कोविडच्या परिणामाला मागील 9 महिन्यांपासून समोर जात आहे. जिथे वेगवेगळे पदार्थ बनवून तो अनेकांना खाऊ घालायचा. त्याच बनवलेल्या पदार्थांच्या सुगंधाने घरातील मंडळी त्यावर ताव मारायची. पण ऋषी आज केवळ वरण आणि पोळी खाऊ शकतो. या व्यतिरिक्त कुठलाही घरात शिजणारा पदार्थांतुनही त्याला दुर्गंध येतो. त्यामुळे तो पूर्णतः नैराश्यातून जातोय. जाणून घेऊ त्याच्याबद्दल या खास रिपोर्टमधून...
सुगंधित आयुष्य दुर्गंधीत गेले बदलून -
ऋषी दुबे हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी तयारी करत आहे. नागपुरात तो त्याच्या मावशीकडे राहत आहे. कोरोनाच्या दुसऱ्याच्या लाटेत ऋषींचे वडीलाला एप्रिल 2021 मध्ये कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यावेळी वडिलांचा उपचारादरम्याम ऋषीलाही कोरोनाची लागण झाली. तेव्हापासून चव आणि स्मेल गेलेला तो दिवस आणि आजचा दिवस तब्बल नऊ महिन्याचा कालावधी लोटून गेला आहे. मात्र ऋषीची 'टेस्ट आणि स्मेल' ही परत आलीच नाही. त्यामुळे ऋषीचे सुगंधित आयुष्य दुर्गंधीत बदलून गेले. आता तर घरातली अगरबत्ती असो की एखाद्या परफ्युम, की घरात शिजणारा पदार्थांचा सुगंध ऋषीला केवळ दुर्गंध येतो. त्यामुळे त्याची जेवणाची इच्छा उडालेली आहे. या दरम्यान साधारण 8 ते 9 किलो वजन कमी होऊन 50 किलोच्या खाली त्याचे वजन आले आहे. प्रकृतीसोबत मानसिक ताणतणावातून तो सध्या लढतोय ते म्हणजे पॅरासेमिया ( Parosmia ) या पोस्ट कोविडच्या आजाराविरुद्ध.
त्याला वेगवेगळे डिसेस बनवण्याची होती आवड -
ऋषी दुबे हा गेल्या काही वर्षांपासून मावशी डॉ. प्रेमलता तिवारी यांच्याकडे राहतो. तसे ऋषीला इंडियन वेस्टर्न, पंजाबी, इटालियन हे पदार्थ बनवण्याची त्याची विशेष आवड होती. पण पॅरासेमिया हा आजार होण्यापूर्वी तो घरातील मंडळींना रोज नवनवीन पदार्थांची मेजवानी देत. पण जेव्हापासून त्याला पॅरासेमिया या आजाराची लागण झाली तेव्हापासून ऋषीचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. कारण त्याचा हाताचा पदार्थांना असलेली चव आणि सुगंधच आज त्याला नकोसा झाला आहे. सध्याच्या जेवणात ऋषी हा वरण पोळी किंवा पनीरला हळद आणि मीठाची फोडणी देऊन आपली रोजची भूक भागवतो. इतके निरनिराळे पदार्थ खाऊन आनंदी जगणारा आणि इतरांनाही आनंद देणारा ऋषी आज मात्र हिरमुसला आहे. यासाठी अनेक रुग्णालयात गेले तरी निराशाच हाती आली.