महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राजकीय पक्षांनी आपल्या फायद्यासाठी संघाला आरक्षणविरोधी असल्याचे भासवले -दिलीप देवधर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

संघाच्या इतिहासातील भूमिका पाहता, समाजातील विषमता, उच्च-निचता हा दोष जोपर्यंत समाजात आहे, तोपर्यंत राष्ट्र हे समृध्द आणि सफल होऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत समाजातील दुर्बल कमजोर घटकाला वाटेल की आरक्षणाची गरज आहे, तोपर्यंत आरक्षण राहावे. अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे, असे मत सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे यांनी नुकतेच मांडले होते. त्यावर संघ अभ्यासक दिलीप देवधर यांच्याशी ईटीव्ही भारत'ने संवाद साधला आहे.

संघ अभ्यासक दिलीप देवधर यांच्याशी ईटीव्ही भारत'चा संवाद
संघ अभ्यासक दिलीप देवधर यांच्याशी ईटीव्ही भारत'चा संवाद

By

Published : Aug 13, 2021, 4:45 PM IST

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासातील भूमिका पाहता, समाजातील विषमता, उच्च-निचता हा दोष जोपर्यंत समाजात आहे, तोपर्यंत राष्ट्र हे समृध्द आणि सफल होऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत समाजातील दुर्बल कमजोर घटकाला वाटेल की आरक्षणाची गरज आहे, तोपर्यंत आरक्षण राहावे. अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे, असे मत सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे यांनी नुकतेच मांडले होते. त्यावर संघ अभ्यासक दिलीप देवधर यांच्याशी ईटीव्ही भारत'ने संवाद साधला आहे.

संघ अभ्यासक दिलीप देवधर यांच्याशी ईटीव्ही भारत'चा संवाद

'संघ हिंदू धर्मातील दोष दूर करून शक्तीस्थळ वाढवण्यासाठी प्रयत्न करणारी संघटना'

संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे यांनी अरक्षणाबाबत संघाची भूमिका सविस्तर मांडली. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षण विरोधी नसून, आरक्षण असले पाहिजे अशा भूमिकेचा आहे. तसेच, त्यासोबत आरक्षणासंदर्भात प्रबोधनाचे काम करत आरक्षण का असावे, समाजाचे दोष कोणते, तसेच, कुठले दोष दूर केले पाहिजेत. यामध्ये समृद्ध कसे होता येईल यावर चर्चा घडवून आणण्याचे काम करते. मात्र, राजकीय पक्षांनी आपल्या फायद्यासाठी त्या वक्तव्यांना फोडणी देऊन संघ आरक्षण विरोधी कसा आहे, हे मांडण्याचे काम केले आहे. राजकीय संघटना निवडणुका जिंकण्यासाठी गैरसमज निर्माण करतात. मात्र, मी अभ्यासक म्हणून हे सांगतो, की संघ हिंदू धर्मातील दोष दूर करून शक्तीस्थळ वाढवण्यासाठी प्रयत्न करणारी संघटना आहे, अस मत दिलीप देवधर यांनी व्यक्त केले आहे.

'आमदार खासदार यांची संख्या संघ प्रभावतील राष्ट्रीय पक्षात जास्त'

सहा वर्षांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेव्हा आरक्षणासंदर्भात चर्चा व्हावी असे म्हटले, तेव्हा यात विभाजनवादी लोकांनी चुकीचा अर्थ लावून खोटा प्रचार केला अस संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी यावेळी सांगितले. भारतीय इतिहासाच्या कालखंडात पाहिल्यास ओबीसी, एससी, एसटी वर्गातील सर्वाधिक आमदार खासदार यांची संख्या संघ प्रभावतील राष्ट्रीय पक्षात, इतर पक्षांच्या तुलेत जास्त दिसून येईल. पण पोटदुखी असणारे लोक अफवा पसरवतात. याला स्थान नाही. तेच कमजोरी नाकारायची नसून, ताकद वाढवायची असते आणि संघ नाकारत नसून ते स्वीकारून दुरुस्त करण्याचे काम कायम करत असतो असंही दिलीप देववधर यावेळी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details