नागपूर -आमदारांच्या अपात्रतेबद्दल ( Regarding disqualification of MLA ) सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ( Supreme Court ) घटनेनुसार, कायद्याला धरून असणे अपेक्षित आहे. येणाऱ्या निकालावर महाराष्ट्रसह देशाचे लक्ष आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबविला आहे. जर उद्याचा निर्णय सरकारच्या विरोधात गेला तर, पुन्हा एकदा महाराष्ट्रात भूकंप ( Political crisis in Maharashtra ) घडेल. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल हे आता सांगता येत नाही. असे, वक्तव्य राज्याचे माजी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Former Rehabilitation Minister Vijay Vadettiwar ) यांनी केले आहे. ते नागपुरात माध्यमांशी निवस्थानी बोलत होते. 92 नगर परिषदेच्या निवडणुका ( Municipal elections ) होऊ घातल्या आहे. आमचे सरकार असतांना इंपेरिकल डेटा हा बांठिया आयोगाने तयार केला आहे. यात 12 जुलैला सुनावणी आहे. आडनावावरून दुरूस्तीचे काम काम झाले. सुरवातीला आडनावारून नाव घेण्याचे काम सुरू होते. त्यात आठ दिवस दुरुस्ती करून घेण्यात आली. त्यासाठी डेटा तयार करण्यासाठी आठ दिवस विलंब झाला आहे. निवडणूक जाहीर झाल्याने यात निवडणुका थांबतील की नाही, माहीत नाही, पावसाळ्यात मतदान होऊ नये. तसेच ओबीसींच्या आरक्षणा शिवाय ( OBC reservation ) मतदान घेऊ नये असे विनंती या सरकारला केली आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.
लोकांनी संभ्रम ठेवू नये -आम्ही काँग्रेसचे 11 आमदार बहुमत चाचणीला उशिरा पोहोचलो त्यामुळे चर्चेला पेव फुटला आहे. बहुमत चाचणीच्या दिवशी 9 मिनिट उशिरा पोहोचलो. आम्हाला वाटले होते की, आधी चर्चा होईल नंतर मतदान होईल. मात्र, आमची अनुपस्थिती लक्षात घेऊन लगेच पोल मागितला. आम्हाला जाणून हे करायचे असते तर आम्ही बहुमत चाचणीच्या दिवशी विधान भवनात गेलोच नसतो असाही खुलासा त्यांनी केला. कोणी ही आमच्या बद्दल संभ्रम ठेऊ नये. सत्तेतील लोकांकडे बहुमत असल्याने त्यामुळे आम्ही बहुमत चाचणीच्या दिवशी गेलो काय आणि नाही गेलो काय, निकालावर काही परिणाम होणार नव्हता असेही ते म्हणालेत.