नागपूर -नागपूर शहर पोलीस भरती घोटाळ्याची चौकशी सुरू आहे, मात्र या घोटाळ्यात कोणतीही टोळी सक्रिय नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे. काही उमेदवारांनी संगनमत करून डमी उमेदवार परीक्षेला बसवले होते का, अशी शंका उपस्थित झाली असून त्याअनुषंगाने चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी आठ ते दहा उमेदवार पोलिसांच्या रडारवर आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
पोलीस भरती घोटाळा : कोणतीही टोळी सक्रिय नाही, आणखी 8 ते 10 आरोपी पोलिसांच्या रडारवर - अमितेशकुमार - पोलीस अधीक्षक अमितेशकुमार
नागपूर शहर पोलीस भरती घोटाळ्याची चौकशी सुरू आहे, मात्र या घोटाळ्यात कोणतीही टोळी सक्रिय नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे.
![पोलीस भरती घोटाळा : कोणतीही टोळी सक्रिय नाही, आणखी 8 ते 10 आरोपी पोलिसांच्या रडारवर - अमितेशकुमार SP Amitesh Kumar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14151913-511-14151913-1641832648174.jpg)
हे ही वाचा -Meeting on ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अनिल परब, शरद पवार यांची बैठक; सदावर्तेंच्या जागी नवे वकील, पवार म्हणाले...
आणखी काही आरोपी पोलिसांच्या रडारवर -
पोलीस शिपाई, वाहन चालक पदासाठी घेण्यात आलेल्या भरतीत काही उमेदवारांनी आपल्या जागी डमी उमेदवारांना परीक्षेत बसवल्याचा खुलासा झाल्यानंतर नागपूर शहर पोलीस विभागाकडून परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया तपासून बघितली जात आहे, ज्यामध्ये पोलिसांना आणखी आठ ते दहा आरोपी सहभागी आल्याचा संशय आहे. त्या आधारे पोलिसांनी त्या आरोपींचा रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू केले असून लवकरच त्यांना अटक करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.