नागपूर - नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामठा परिसरात रात्री उशिरापर्यंत एक पार्टी सुरू होती. एका खाजगी जागेवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे पोलीसांच्या परवानगी शिवाय ही पार्टी सुरू होती. पार्टीत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आणण्यात आला होता. पोलिसांनी अचानक कारवाई ( Police Raid The Night Party ) करीत सर्व मद्यासाठा जप्त ( Seizure Of Liquor ) केला आहे. या पार्टीमध्ये मद्यासोबत ड्रग्सचा वापर ( Police Will Investigate Used Of Drugs ) सुरू होता का, याचा तपास पोलिस आता करणार आहेत.
मध्यरात्रीनंतर पोलिसांची धाड - जामठा परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत एक पार्टी सुरू असल्याची माहिती डीसीपी गजानन राजमाने यांना मिळाली. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या डीसीपी गजानन राजमाने यांनी या पार्टीवर रविवारी मध्यरात्रीनंतर धाड टाकली. यावेळी या पार्टीत डिजेच्या तालावर शेकडो तरुण-तरुणी नाचत होते. अचानक पोलिसांनी टाकलेल्या धाडीमुळे एकच गोंधळ उडाला. पार्टी आयोजकांकडे पोलिस परवानगी नव्हती. केवळ परवानगी मागण्यासाठी दिलेला अर्ज होता. लाऊड स्पीकर आणि मद्य वापराची परवानगी असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.