नागपूर - नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने शहाराजवळील हिंगणा येथील एका बारवर धाड टाकली आहे. नागपूर पोलिसांनी बार मालकासह कुख्यात गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी बार संचालक निलेशला अटक केली आहे. तसेच यात काहींना अटक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
Dance Bar Raid in Nagpur : डान्सबारवर पोलिसांचा छापा, बार मालकावर गुन्हा दाखल - नागपूर पोलीसांची कारवाई
नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला हिंगणा हद्दीत मोंढा गावाच्या एका कोपऱ्यात असलेल्या आदित्य बार आणि रेस्टॉरेंटमध्ये अनेक गुंड लोकांनी पार्टी केल्याची ( Dance Bar Raid in Nagpur ) माहिती मिळाली होती. आदित्य बारमध्ये धाड टाकली असता पोलिसांना फारसं काही आढळून आले नाही.
नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला हिंगणा हद्दीत मोंढा गावाच्या एका कोपऱ्यात असलेल्या आदित्य बार आणि रेस्टॉरेंटमध्ये अनेक गुंड लोकांनी पार्टी केल्याची माहिती मिळाली होती. आदित्य बारमध्ये धाड टाकली असता पोलिसांना फारसं काही आढळून आले नाही. मात्र, माहिती पक्की असल्याने पोलिसांनी बार मधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा त्यात काही गुंड महिलांवर पैसे उधळत आहेत. गझल कार्यक्रमाच्या नावावर तेथे डान्सबार भरवण्यात आला आल्याचे निष्पन्न झाले. यावर पोलिसांनी आरोपी राजेश पांडे, गिरीश कनोजिया, प्रदीप उके आणि नव्वा हे गुंड तसेच काही महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -Nashik Crime : सोबत आलेल्या चिमुकलीला वडिलांनी घरी जाण्यास सांगितले, घडली धक्कादायक घटना