महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूरमध्ये पोलीस बंदोबस्तात डुक्कर पकडण्याची मोहिम - विशेष पथक

नागपूर शहरात पहिल्यांदाच पोलीस बंदोबस्तात डुक्कर पकडण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी तामिळनाडू येथून विशेष पथकही बोलावण्यात आले आहे. सोमवारी या मोहिमेला सुरूवात करण्यात आली. शहरात प्रथमतःच अशी आगळीवेगळी मोहीम राबविण्यात येत असल्याने पाहणाऱ्यांचीही करमणूक होताना दिसते.

नागपूरमध्ये पोलीस बंदोबस्तात डुक्कर पकडण्याची मोहिम

By

Published : Jul 22, 2019, 6:53 PM IST

नागपूर- नागपूर शहरात डुकरांचा हैदोस वाढलेला आहे. डुकरांमुळे रोगराई पसरण्याची शक्यता पाहता शहरातील डुकरांना शहराबाहेर सोडण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी पालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला डुकरांच्या मालकांनी कडाडून विरोध केल्याने पोलीस संरक्षणात ही मोहीम राबविण्यात येत आहे.

नागपूरमध्ये पोलीस बंदोबस्तात डुक्कर पकडण्याची मोहिम

शहरात डुकरांचा सुळसूळाट

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानुसार नागपूर शहरात सध्या १० हजार डुकरांचे वास्तव्य आहे. या डुकरांमुळे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. काहीवेळा ही डुकरे घरात घुसतात, नासधूस करतात. यामुळेच पालिकेकडून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

तामिळनाडू येथून बोलावले विशेष पथक

डुकर पकडण्यासाठी महापालिकेने तामिळनाडू येथून विशेष पथक बोलावले आहे. या पथकात २१ विशेष तज्ञ लोकांचा समावेश आहे. दिवसाला १०० ते २०० डुक्कर पकडणाऱ्या पथकाचे कौशल्ये मात्र वाखण्याजोगे आहे.

तामिळनाडू येथून बोलावले विशेष पथक

पहिल्या दिवसाची जोरदार सुरूवात

सोमवारी सुरू करण्यात आलेल्या या मोहीमेत, सुरुवातीचे दोन तास एकही डुक्कर न गवसल्याने पथकात निराशा होती. तामिळनाडूच्या या विशेष पथकाची चाहूल डुकरांना लागली आणि ते पलायन करून इतरत्र स्थलांतरित झाले की काय, अशी शंका येऊ लागली. मात्र थोड्या वेळाने बऱ्याच प्रयत्नानंतर डुकरांची लॉटरीच जणू या पथकाच्या हाती लागला.

डुकरांमुळे शहरात वेगवेगळे आजार पसरतात, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली - पालिका आरोग्य विभाग

महापालिकेने पाहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात डुक्कर पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पोलिसांची मदत देखील घेण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानुसार नागपूर शहरात दहा हजार डुकरांचा वास्तव्य आहे. या मुळे शहरात जपानी ज्वर आणि स्वाइन फ्लू सारखे आजार पसरतात. डुकरांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय असल्याने नागपूर महानगरपालिका गेल्या महिन्याभरापासून डुक्कर पकडण्याचा कार्यक्रम राबवत होते. मात्र पाहिजे त्याप्रमाणे यश मिळत नसल्याने अखेर आरोग्य विभागाने डुक्कर पकडणाऱ्या विशेष पथकाचा शोध घेतला आणि नागपुरातील डुकरांची संख्या कमी करण्याचा ठेका त्यांना देऊन टाकला. असे पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले.

तामिळनाडू येथून बोलावले विशेष पथक

डुक्कर पकडण्यासाठी सुद्धा पोलिसांचीच मदत

शहरात इतक्या मोठ्या संख्येने डुक्कर राहत असतील याचा अंदाज नागपूरकरांनाही नसेल. ही संपूर्ण डुक्कर पकड मोहीम पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पाडली जात आहे. मनपा अधिकाऱ्यांचे मते महापालिकेची ही मोहीम सुरू असताना डुकरांचे मालकांनी कडाडून विरोध केला जाईल. त्यामुळेच पोलीस संरक्षणाची गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details