नागपूर - शिवसेनेचे खासदार ही बंड करू शकतात ( Shiv Sena MP rebellion ) आणि आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची ( Prime Minister Narendra Modi ) भेट घेऊ शकतात. या शक्यतेनंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर पोलिसांनी बंदोबस्त ( Police deployed in front of MPs house ) दिला आहे. नागपुरात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने ( Nagpur MP Krupal Tumane ) यांच्या नागपूर कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त ( Police deployed in front of office )लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. नागपुरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त लावल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
खासदारही शिंदे गटात सामील होईल ? -रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाणे हे शिंदे गटात जाणार आहे का असा प्रश्न शिंदे गटात सामील झालेले आशिष जयस्वाल यांनी केला. तेव्हा उत्तर देताना म्हणाले आमदार आहे तर खासदारानीही राहायलाच पाहिजे ना, असे उत्तर देत जाण्याचेच संकेत दिले. शिवसेनेचे खासदार शिंदे गटात जाणार आहे. उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार अशी माहिती येत असतांना यावर मात्र मी भाष्य करणे योग्य नाही. पण 'आगे देखो होता है क्या' म्हणत एक प्रकारे संकेतच दिले.