नागपूर - शनिवारी पहाटे शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. विशाल मानकर असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते घरी जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
नागपुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - पोलीस
विशाल मानकर असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते घरी जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल मानकर हे नागपूर येथे लकडगंज पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ते रात्री आपले काम संपवून घरी जात असताना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना कामठी रोडवरील रतन कॉम्प्लेक्सजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच शांतीनगर आणि लकडगंज पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी अपघातास कारणीभूत अज्ञात वाहन चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.