महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bullion Robbery Case Nagpur : पडद्या मागील हिरोच्या कर्तव्यनिष्ठेमुळे लागला लूट प्रकरणाचा छडा - कर्तव्यनिष्ठेमुळे लागला लूट प्रकरणाचा छडा

नागपूर शहर पोलिसांनी ( Nagpur City Police ) आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. या लूट प्रकरणाचा छडा ( Bullion Robbery Case Nagpur ) लावण्याचे श्रेय कुणा एक अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला देता येणार नाही. मात्र या संपूर्ण प्रकरणाच्या तपास पथकाचा भाग नसताना देखील एका गंभीर आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांने आरोपीची ओळख पटवण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे, त्यामुळेच आज गुन्हेगार आपल्या कर्माची फळे भोगत आहेत. हे कर्मचारी आहेत 39 वर्षीय नाईक पोलीस कॉन्स्टेबल अंकुश राठोड ( Police Constable Ankush Rathod )

अंकुशचा सत्कार करताना पोलीस
अंकुशचा सत्कार करताना पोलीस

By

Published : Apr 19, 2022, 4:02 PM IST

नागपूर -सराफा व्यापाऱ्याला गंभीर जखमी करून लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लूट प्रकरणाचा छडा लावण्यात अनेक कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळेच आज सर्व गुन्हेगारांना अटक झाली आहे. सामूहिक प्रयत्नातून काय किमया घडू शकते याचं उत्तम उदाहरण नागपूर शहर पोलिसांनी ( Nagpur City Police ) आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. या लूट प्रकरणाचा छडा ( Bullion Robbery Case Nagpur ) लावण्याचे श्रेय कुणा एक अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला देता येणार नाही. मात्र या संपूर्ण प्रकरणाच्या तपास पथकाचा भाग नसताना देखील एका गंभीर आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांने आरोपीची ओळख पटवण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे, त्यामुळेच आज गुन्हेगार आपल्या कर्माची फळे भोगत आहेत. हे कर्मचारी आहेत 39 वर्षीय नाईक पोलीस कॉन्स्टेबल अंकुश राठोड ( Police Constable Ankush Rathod )

ज्यावेळी ही घटना घडली त्याच्या काही दिवसांपूर्वीच अंकुश राठोड यांच्या हृदयाची अँजिओप्लास्टी झाली होती. त्यांच्या हृदयात 80 टक्के ब्लॉकेज असल्याचे निदान झाले असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांना सराफा व्यापारी लूट प्रकरणाची माहिती समाजात त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता बेड वरूनच कामाला लागले होते. अंकुश यांनी त्यांच्या सर्व इन्फोर्मर(खबरी) कामाला लावले. त्यामुळेचे या प्रकरणातील गुन्हेगारांची ओळख पटू शकली. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी अंकुश राठोड यांना 75 हजार रुपायांचा रिव्हॉर्ड जाहीर केला. मात्र त्यांची तब्येत बरी नसल्याने ते कार्यक्रमात हजर राहू शकले नाही. त्यामुळे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने अंकुश यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला आहे.


नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार कुमार यांनी सराफा व्यापारी लूट प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वायरलेस वरून कर्मचाऱ्यांना एक कानमंत्र दिला. त्यानंतर तर चमत्कारच घडल्याचे चित्र सर्वांच्या समोर आहे. पोलीस आयुक्तांच्या वायरलेस मॅसेजनंतर पोलीस कर्मचारी मोहीम फत्ते करण्यासाठी झपाटल्यासारखे कामला लागले होते. पाचपावली डिटेक्शन ब्रँचचे नाईक पोलीस कॉन्स्टेबल अंकुश राठोड यांनी कर्तव्यावर नसताना देखील गुन्हेगारांची ओळख पटवण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.



'अंकुश राठोडचा आम्हाला अभिमान' :सराफा व्यापारी लूट प्रकरणाचा छडा लागल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. लूट प्रकरणाचा तपास करण्यापासून तर सर्व आरोपींना अटक करण्यापर्यंत या मोहिमत सहभागी असलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मात्र अंकुश राठोड यांची तब्येती बरी नसल्याने ते सत्कार कार्यक्रमात येऊ शकते नव्हते. मात्र पोलीस आयुक्तांनी अंकुश यांचे खूप कौतुक केले होते. पोलीस आयुक्तांचा निरोप घेऊन डीसीपी राजमाने अंकुश यांच्या घरी गेले तेव्हा त्यांनी देखील अंकुश यांच्यावर सार्थ अभिमान वाटतो, अशी भावना व्यक्त केली.


'मी तर माझे काम केले' :डीसीपी गजानन राजमाने यांनी अंकुश यांचा सत्कार केल्यानंतर अंकुश यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. अंकुश यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना फार बोलणे शक्य नाही. मात्र मी पोलीस विभागाचा सच्चा सिपाई आहे आणि मी केवळ माझे कर्तव्य पूर्ण केले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -सराफा व्यापारी लूट प्रकरण: पोलीस आयुक्तांचा वायरलेसवर 'कानमंत्र', पोलिसांनी 20 तासात जप्त केले 60 लाखांचे दागिने

ABOUT THE AUTHOR

...view details