नागपूर -छत्तीसगड सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपुरात आत्महत्या केली आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूजा लॉजमध्ये हा प्रकार घडला आहे. राजेश श्रीवास्तव असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते छत्तीसगड शासनात कोषागार विभागाचे सहसंचालक पदावर कार्यरत होते. ही घटना बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आली.
या संदर्भात सीताबर्डी पोलिसांनी घटनास्थळावरून काही लिक्विड (द्रव्य) जप्त केलं आहे. ते काय आहे हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे. मृतक श्रीवास्त यांचे कुटुंबीय नागपुरात दाखल झाले आहेत.
राजेश श्रीवास्तव हे छत्तीसगड राज्यात कोषागार विभागात कार्यरत सहसंचालक पदावर कार्यरत होते. काल रात्री त्यांचा मृतदेह सीताबर्डी पूजा लॉजमध्ये संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. त्यांच्या खोलीत विषारी पावडरच्या दोन पुड्या मिळून आल्या आहेत. राजेश श्रीवास्तव हे दोन मार्च रोजी तारखेला नागपूर च्या पूजा लॉज मध्ये आले होते. मात्र काल ते लॉज मध्ये असताना बराच वेळ त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना संशय आला त्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने खोलीचं दार तोडण्यात आलं तर ते मृतावस्थेत आढळून आले होते. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
श्रीवास्तव नागपुरात आले कसे?