महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोंदियात अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर धाड, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गोंदिया येथील अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली.

जप्त केलेली अवैध दारू

By

Published : Feb 23, 2019, 1:54 PM IST

नागपूर - गोंदिया शहरात सुरू असलेल्या अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी अधिकाऱ्यांनी दारूच्या २५३ पेट्या जप्त केल्या असून त्याची किंमत २२ लाख रुपये आहे. तसेच ३ चारचाकी गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गोंदिया येथील अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी तेथे देशी दारू बॉटलींगच्या कारखान्यासह स्पिरीटचा मोठा साठा आढळून आलेला आहे. गोंदियातील मुरली रोड येथील बाजपेयी वार्डात हा व्यवसाय सुरू होता.


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या अवैध कारखान्यातून २५३ पेट्या देशी दारूचा साठा जप्त केलेला आहे. चौकशीदरम्यान या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाम चातिरे आणि त्याचा भागीदार विजू पळून गेले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ए, बी, सी, डी, इ, एफ ८१, ८३ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूची एकूण किंमत २२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याठिकाणाहून ३ चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. त्या वाहनांचा उपयोग दारू तस्करीच्या कामाकरिता होत असल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला आहे. तपासाला सुरुवात करण्यात आली असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details